कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या तरूणीला गुंडानं अडवलं, प्राणघातक हल्ला केला अन्.. पुढे काय घडलं?

Ahmednagar College Girl: तरुणीवर गुंडाचा रक्तरंजित हल्ला; कॉलेजच्या वाटेत घडली अंगावर शहारे आणणारी घटना. तरूणीवर रूग्णालयात उपचार सुरू.
Ahmednagar College Girl Assaulted with Knife
Ahmednagar College Girl Assaulted with KnifeSaam Tv
Published On
Summary
  • कॉलेजमधील विद्यार्थिनीवर धारदार शस्त्राने हल्ला.

  • आरोपी महेश भीटे घटनास्थळावरून फरार.

  • युवती गंभीर जखमी.

  • रुग्णालयात उपचार सुरू.

अहिल्यानगरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या तरूणीवर धारदार शस्त्राने वार करण्यात आलं आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या युवकाने तिच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची माहिती आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तरूणीला उपचारासाठी रूग्णालयात हलवले. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

गार्गी शिंदे असे युवतीचे नाव आहे. तरूणी सावेडी उपनगरातील पाऊलबुद्धे कॉलेज येथे शिक्षण घेत आहे. तर, महेश भीटे असे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपी तरूणाचे नाव आहे. घटनेची दिवशी आरोपीनं तरूणीला गाठलं. नंतर तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात तरूणी गंभीर जखमी झाली.

Ahmednagar College Girl Assaulted with Knife
२ नातवंडांच्या आजीला म्हातारचळ; बॉयफ्रेंडच्या प्रेमात सैराट, सुनांचे दागिने घेऊन फरार

हल्ला झाल्यानंतर आरोपीनं पळ काढला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तरूणीला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमी युवतीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. जिल्हा रुग्णालयात पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी भेट दिली.

Ahmednagar College Girl Assaulted with Knife
शिंदे सेनेच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला, करमाळ्यातील शेतात मारलं, संशयाची सुई कुणाकडे?

तसेच तरूणीची विचारपूस केली. याबाबत तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी तरूण महेश भीटे हा पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com