Crime: इथे रोज आली तर ५००० रुपये देईन, जबरदस्ती ऑफिसमध्ये नेलं अन्...; सरपंचाच्या नवऱ्याचं अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमध्ये १७ वर्षांच्या मुलीसोबत सरपंचाच्या नवऱ्याने भयंकर कृत्य केले. धावत्या कारमध्ये तिच्यासोबत जबरदस्ती करण्यात आली. तसंच इथे रोज आली तर ५००० रुपये देईन असे आरोपी म्हणाला.
Crime: इथे रोज आली तर ५००० रुपये देईन, जबरदस्ती ऑफिसमध्ये नेलं अन्...; सरपंचाच्या नवऱ्याचं अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य
Uttar Pradesh Crime NewsSaam TV News
Published On

Summary:

  • उत्तर प्रदेशमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग

  • सरपंचाच्या नवऱ्याने केलं भयंकर कृत्य

  • कारमध्ये बसवून जबरदस्ती ऑफिसमध्ये नेलं

  • ऑफिसमध्ये या मुलीवर जबरदस्ती करण्यात आली

सरपंचाच्या नवऱ्याने अल्पवयीन मुलीला जबरदस्ती ऑफिसमध्ये नेऊन तिच्यासोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. उत्तर प्रदेशच्या बिजनौर जिल्ह्यात ही घटना घडली. 'इथे रोज आली तर तुला ५००० रुपये देईन', असे म्हणत त्याने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलीने कशी तरी सुटका करत तिथून पळ काढला. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी सरपंचाच्या नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला.

मिळालेल्या माहितीनुसार, १७ वर्षांची मुलगी १४ जानेवारीला सकाळी ११ वाजताच्या सुमारास गावातील बस स्टँडवर उभी होती. त्याठिकाणी गावातील सरपंचाचा नवरा कार घेऊन आला. त्याने तिला मी तुला बिजनोर शहरात जिथे जायचे आहे तिथे सोडतो असे सांगून कारमध्ये बसवलं. कारमध्ये बसल्यानंतर तो तिच्यासोबत अश्लील कृत्य करू लागला. मुलीने त्याला कार थांबवण्यास सांगितले तर त्याने कार न थांबता तिचा मोबाईल हिसकावून घेतला जेणे करून ती कुणालाच फोन करू शकणार नाही.

Crime: इथे रोज आली तर ५००० रुपये देईन, जबरदस्ती ऑफिसमध्ये नेलं अन्...; सरपंचाच्या नवऱ्याचं अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य
Crime: गळा दाबून गर्लफ्रेंडची हत्या, मृतदेहाचे तुकडे करून ७ दिवस घरात जाळले, निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याचे भयंकर कृत्य

त्यानंतर त्याने तिला त्याच्या कार्यालयात नेलं आणि तिच्यावर जबरदस्ती करू लागला. यावेळी त्याने तिला ऑफर दिली. तुला दररोज इथे यावे लागेल. मी तुला प्रत्येक भेटीसाठी ५००० रुपये देईल. पीडितीने नकार दिल्यानंतर आरोपी तिला जबरदस्ती करू लागला. मुलीने कशी तरी सुटका करून घेत तिथून पळ काढला आणि घर गाठले. त्यानंतर पीडितेच्या आईने पोलिस ठाण्यात धाव धेत या प्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी सरपंचाच्या नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली.

Crime: इथे रोज आली तर ५००० रुपये देईन, जबरदस्ती ऑफिसमध्ये नेलं अन्...; सरपंचाच्या नवऱ्याचं अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य
Crime: कामाच्या बहाण्यानं राजस्थानला बोलावलं; १० दिवस डांबून सामूहिक अत्याचार नंतर..., महाराष्ट्रातल्या तरुणीसोबत नेमकं काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com