Crime: गळा दाबून गर्लफ्रेंडची हत्या, मृतदेहाचे तुकडे करून ७ दिवस घरात जाळले, निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याचे भयंकर कृत्य

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशच्या झाशीमध्ये भयंकर हत्याकांड घडलं. निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याने ३२ वर्षांनी लहान गर्लफ्रेंडची हत्या केली. हत्येनंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून घरामध्ये ७ दिवस जाळले.
Crime: गळा दाबून गर्लफ्रेंडची हत्या, मृतदेहाचे तुकडे करून ७ दिवस घरात जाळले, निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याचे भयंकर कृत्य
Uttar Pradesh CrimeSaam Tv
Published On

Summary:

  • उत्तर प्रदेशमध्ये रिटायर्ड रेल्वे कर्मचाऱ्याने गर्लफ्रेंडची हत्या केली

  • गळा दाबून गर्लफ्रेंडला संपवल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले

  • त्यानंतर ७ दिवस आरोपीने घरामध्येच मृतदेहाचे तुकडे जाळले

उत्तर प्रदेशच्या झाशीमध्ये एक खळबळजनक घटना घडली. याठिकाणी एका व्यक्तीने ३२ वर्षांनी लहान असलेल्या गर्लफ्रेंडची हत्या केली. हत्येनंतर तिच्या मृतदेहाचे तिकडे करत ७ दिवस त्याने ते घरामध्ये जाळले. या महिलेचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेहाचे तुकडे, हाडं एका निळ्या रंगाच्या ड्रममध्ये भरून आरोपी फेकायला जात होता. पण दुर्गंधी येत असल्यामुळे शेजारच्यांनी पोलिसांना बोलावले. त्यानंतर आरोपीने पळ काढला. पण पोलिसांनी शोध घेत त्याला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, झाशीच्या सिप्री बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही भयंकर घटना घडली. निवृत्त रेल्वे कर्मचारी राम सिंह परिहारने त्याच्यापेक्षा ३२ वर्षांनी लहान असलेल्या गर्लफ्रेंडची निर्घृण हत्या केली. त्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे तुकडे केले. दुर्गंधी येऊ नये आणि पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने शरीराचे तुकडे घरात लपवून ठेवत ७ दिवस जाळत राहिला. राम सिंह परिहारची गर्लफ्रेंड त्याच्याकडे सतत पैशांची मागणी करत होती. याच त्रासाला कंटाळून त्याने तिची हत्या केली.

Crime: गळा दाबून गर्लफ्रेंडची हत्या, मृतदेहाचे तुकडे करून ७ दिवस घरात जाळले, निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याचे भयंकर कृत्य
Crime News: ५०० रुपयांसाठी मैत्री विसरला; मित्राला क्रूरपणे संपवलं, तरुणानं मृतदेह घरी पोहोचवला, नंतर...

पोलिसांनी सांगितले की, गर्लफ्रेंड सतत पैशांची मागणी करत असल्यामुळे संतप्त होत राम सिंह परिहारने तिच्या हत्येचा कट रचला. ७ जानेवारीला त्याने गर्लफ्रेंडला एका भाड्याच्या खोलीत नेले आणि तिची गळा दाबून हत्या केली. हत्येनंतर त्याने मृतदेह खोलीत लपवून ठेवला. जेव्हा दुर्गंधी येऊ लागली तेव्हा त्याने मुलाच्या मदतीने मृतदेहाचे तुकडे केले आणि ते जाळले. त्यानंतर त्याने जळालेले मृतदेहाचे तुकडे, हाडं आणि राख एका निळ्या ड्रमममध्ये भरली.

Crime: गळा दाबून गर्लफ्रेंडची हत्या, मृतदेहाचे तुकडे करून ७ दिवस घरात जाळले, निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याचे भयंकर कृत्य
Crime News: रॉडनं मारलं, नंतर सुनेचा हात कापला; सासरा आणि पती म्हणाले, 'अधिकारी किंवा नेते कोणीही आमचं काही करू शकत नाही...'

आरोपीला मृतदेहाची विल्हेवाट लावायची होती. पण त्यापूर्वीच त्याचा कट उधळून टाकण्यात आला. आरोपीने एक लोखंडी पेटी मागवली. त्यामध्ये त्याने गर्लफ्रेंडच्या मृतदेहाचे तुकडे भरले आणि एक ट्रक्सी बोलावून त्यामध्ये ते ठेवले. ट्रक्सीवाल्याला त्याने सांगितलेल्या पत्त्यावर ही पेटी घेऊन चल मी दुचाकीवरून येतो असे सांगितले. पण अर्ध्या रस्त्यात आरोपी गायब झाला. टॅक्सीचालकाला पेटीतून दुर्गंधी येत असल्याने त्याने पोलिसांना याबाबत सांगितले. पोलिसांनी पेटी उघडली असता त्यामध्ये मृतदेहाचे अवषेश सापडले. हे पाहून पोलिसही चक्रावले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत दोन्ही आरोपींना अटक केली.

Crime: गळा दाबून गर्लफ्रेंडची हत्या, मृतदेहाचे तुकडे करून ७ दिवस घरात जाळले, निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याचे भयंकर कृत्य
Crime: कामाच्या बहाण्यानं राजस्थानला बोलावलं; १० दिवस डांबून सामूहिक अत्याचार नंतर..., महाराष्ट्रातल्या तरुणीसोबत नेमकं काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com