Crime: कामाच्या बहाण्यानं राजस्थानला बोलावलं; १० दिवस डांबून सामूहिक अत्याचार नंतर..., महाराष्ट्रातल्या तरुणीसोबत नेमकं काय घडलं?

Crime News: काम देण्याच्या बहाण्याने महाराष्ट्रातील तरुणीला राजस्थानला बोलावून १० दिवस सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे असे पोलिसांनी सांगितले आहे.
young woman from Maharashtra was physical accused for 10 days after being invited to Rajasthan
young woman from Maharashtra was physical accused for 10 days after being invited to RajasthanSaam Tv
Published On

Crime News: राजस्थान उदयपूरमध्ये तीन तरुणांनी मुंबईच्या एका मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपींनी पीडित मुलीला एका इव्हेंट मॅनेजमेंटच्या कामाच्या बहाण्याने उदयपूरला बोलावले होते. ही घटना सुखेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घडली. पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले असून, इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

डीएसपी राजेश यादव यांनी सांगितले की, मुंबईच्या मुलीने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, हिरणमगरी भागातील रहिवासी करण सिंग याने तिला चांगल्या पैशांचे आमिष दाखवून मुंबईहून उदयपूरला एका कार्यक्रमाच्या इव्हेंट मॅनेजमेंटसाठी बोलावले. उदयपूरला पोहोचल्यावर आरोपी तिला सुखेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका फार्महाऊसवर घेऊन गेले. तिला १० दिवस त्या फार्महाऊसवर ठेवण्यात आले. या काळात आरोपी करण आणि त्याचे मित्र हितेश व भूरा यांनी दारूची पार्टी केली. त्यांनी त्या मुलीलाही जबरदस्तीने दारू पाजली.

young woman from Maharashtra was physical accused for 10 days after being invited to Rajasthan
Border 2: 'बॉर्डर २'च्या शेवटी प्रेक्षकांसाठी खास सरप्राईज; धुरंधरची होणार जबरा एन्ट्री

दारूच्या पार्टीनंतर सामूहिक बलात्कार

दारूच्या पार्टीनंतर आरोपी आणि त्याच्या मित्रांनी नशेत असताना त्या तरुणीवर बलात्कार केला. या दरम्यान, आरोपीचे इतर तीन साथीदारही फार्महाऊसवर उपस्थित होते. ती तरुणी फार्महाऊसमधून पळून गेली आणि गुरुवारी संध्याकाळी तक्रार दाखल करण्यासाठी एसपी कार्यालयात पोहोचली. या आधारावर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

young woman from Maharashtra was physical accused for 10 days after being invited to Rajasthan
Crime News: रॉडनं मारलं, नंतर सुनेचा हात कापला; सासरा आणि पती म्हणाले, 'अधिकारी किंवा नेते कोणीही आमचं काही करू शकत नाही...'

फरार आरोपींचा शोध सुरु

पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपी करणला ताब्यात घेतले आहे. इतर दोन फरार आरोपींना अटक करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले जात आहेत. वरिष्ठ अधिकारी स्वतः पोलीस ठाण्यात पोहोचले असून या प्रकरणावर विशेष लक्ष देत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com