दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सोबत हवाई प्रवास; विमानाच्या हवेत तीन घिरट्या नंतर... अचानक काय घडलं?

UP Deputy CMs’ Flight Rerouted : उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांना घेऊन जाणारे विमानाने डायवर्ट करण्यात आले. पायलटने तीनवेळा विमान लखनौच्या विमानतळावर लँड करण्याचा प्रयत्न केला.
UP Deputy CMs’ Flight Rerouted :
Aircraft carrying UP Deputy CMs diverted to Bhopal after failed landing attempts in Lucknow due toSaam tv
Published On
Summary
  • विमान भोपाळकडे वळवण्यात आले. दोन्ही नेते सुरक्षित आहेत.

  • तीन वेळा प्रयत्न करूनही विमान उतरू शकले नाही

  • विमान भोपाळला डायवर्ट करण्यात आले

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांची विमान खराब हवामानामुळे डायवर्ट करण्यात आले. ते दिल्लीहून लखनौला जात होते. परंतु लखनौ विमानतळावर विमान उतरवण्यात अपयश आले. पायलटने तीनवेळा विमान लँड करण्याचा प्रयत्न केला. तिन्ही वेळा अपयश आल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांचे विमान भोपाळला वळवण्यात आले. दोन्ही उपमुख्यमंत्री सुखरूप आहेत.

UP Deputy CMs’ Flight Rerouted :
सम्राट झाले बिहारचे चौधरी, नितीश कुमारांच्या पक्षाचे दोन उपमुख्यमंत्री

खराब हवामानामुळे दोन उपमुख्यमंत्र्यांना घेऊन जाणारे विमान डायवर्ट म्हणजेच वळवण्यात आले आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भोपाळमध्ये उतरवण्यात आले आहे. दिल्लीहून लखनौला जाणारे इंडिगोचे विमान खराब हवामानामुळे वळवण्यात आले. विमानात उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक होते.

UP Deputy CMs’ Flight Rerouted :
Pune Airport: मोठी बातमी! पुणे विमानतळावर भारतीय हवाई दलाच्या विमानाचा अपघात,धावपट्टी तात्पुरती बंद

उपमुख्यमंत्र्यांच्या विमानाच्या पायलटने लखनौ विमानतळावर विमान लँड करण्याचा प्रयत्न केला. तीनवेळा त्यांनी विमान उतरवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात त्यांना अपयश आले. त्यानंतर विमान भोपाळकडे वळवण्यात आले. दोन्ही उपमुख्यमंत्री भोपाळमध्ये सुखरूप उतरले. जोरदार वारे आणि कमी दृश्यमानतेमुळे लखनौच्या विमानतळावर विमान उतरवणे शक्य झाले नाही.

यापूर्वी फेब्रुवारी २०२६ मध्ये नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांनी संसदेला माहिती दिली होती की, इंडिगोच्या ५० टक्के विमानांमध्ये वारंवार बिघाड होत आहे, तेव्हा इंडिगो चर्चेत आली होती. मागील वर्षी जानेवारीपासून सहा नियमित विमान कंपन्यांच्या ७५४ विमानांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३७७ विमानांमध्ये वारंवार होणारे दोष आढळून आले. तपासणी झालेल्या विमानांची संख्या इंडिगोची होती, अशी माहिती सरकारकडून देण्यात आली.

नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सभागृहाला लेखी उत्तरात सांगितले होते की, ३ फेब्रुवारीपर्यंत इंडिगोच्या ४०५ विमानांचे विश्लेषण करण्यात आले, त्यापैकी १४८ विमानांमध्ये वारंवार दोष आढळून आले. तर एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसच्या २६७ विमानांची तपासणी करण्यात आली. यात १९१ मध्ये अनेक खराबी दिसून आली.

एअर इंडियाच्या १६६ विमानांपैकी १३७ विमानांमध्ये दोष आढळले, तर स्पाईसजेटच्या ४३ विमानांपैकी १६ विमानांमध्ये वारंवार दोष आढळून आले. गेल्या काही वर्षांत विमानांशी संबंधित अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे विमानांचे मार्ग बदलण्यात आले किंवा उड्डाणे रद्द करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com