तमिळनाडूमध्ये गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि TVK पक्षाचे नेते आमने-सामने आले आहेत. यामागचे प्रमुख कारण म्हणजे TVK च्या नेत्यांकडून पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री थलपती विजय यांना देशाचे पुढील पंतप्रधान बनवण्याची मागणी केली जात आहे. काँग्रेसला मात्र TVK कडून राहुल गांधी यांच्या तुलनेत विजय यांना पंतप्रधानपदासाठी पुढे केले जात असल्याचा आक्षेप आहे.
याच पार्श्वभूमीवर तमिळनाडूचे मंत्री एस. राजेश कुमार यांनी TVK च्या नेत्यांना थेट इशारा दिला आहे. राहुल गांधी यांनाच 2029 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून पाठिंबा दिला नाही, तर आपण आणि काँग्रेसचे आणखी एक मंत्री मंत्रिपदाचा राजीनामा देऊ, असा इशारा त्यांनी दिला. तसेच राहुल गांधी हेच भारताचे पुढील पंतप्रधान होतील, असा दावाही त्यांनी केला.
तमिळनाडूचे मंत्री एस. राजेश कुमार हे म्हणाले की, 2029च्या लोकसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करण्यास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या TVKने पाठिंबा दिला नाही, तर काँग्रेसचे दोन्ही मंत्री राज्य मंत्रिमंडळातून राजीनामा देतील. सत्ताधारी TVKमधील मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांना आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचा उमेदवार बनवण्याची मागणी वाढत असतानाच राजेश कुमार यांनी हे वक्तव्य केले आहे.
काँग्रेसने मे महिन्यात विजय यांच्या नेतृत्वाखालील TVKला सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर काँग्रेसला राज्य मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. दरम्यान, रविवारी कन्याकुमारी येथे आयोजित एका कार्यक्रमात मंत्री राजेश कुमार यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस आपल्या भूमिकेवर कोणतीही तडजोड करण्याच्या तयारीत नसल्याचे संकेत मिळत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.