काँग्रेसच्या दोन आमदारांचा तडकाफडकी राजीनामा! मुख्यमंत्र्यांचा 'तो' निर्णय जिव्हारी लागला; मोठी खळबळ

Congress Mlas Resign Karnataka Cabinet Expansion Row: कर्नाटकमध्ये मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मंत्रीपद न मिळाल्यामुळे दोन आमदारांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
Congress MLAs resign amid rising dissent ahead of Karnataka cabinet expansion led by CM DK Shivakumar.
Congress MLAs resign amid rising dissent ahead of Karnataka cabinet expansion led by CM DK Shivakumar.saam tv
Published On

कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री डी.के शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीच आज पक्षातील नाराजीनाट्य समोर आली. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने काँग्रेसच्या दोन आमदारांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. राजीनामा देणाऱ्यांमध्ये विजयपुरा जिल्ह्यातील इंडी मतदारसंघाचे आमदार यशवंत रायगौडा व्ही. पाटील आणि सागर मतदारसंघाचे आमदार बेलूर गोपालकृष्णा यांचा समावेश आहे.

Congress MLAs resign amid rising dissent ahead of Karnataka cabinet expansion led by CM DK Shivakumar.
काँग्रेसचा सुपडासाफ! ऐतिहासिक विजय नोंदवून भाजपनं राखला १८ वर्षांचा बालेकिल्ला, कोणाला किती मिळाली मते?

दरम्यान कर्नाटकमध्ये आज सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला यामध्ये 20 नव्या मंत्र्यांना शपथ देण्यात येणार आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळत असल्याने अनेक आमदारांनी नाराजी व्यक्त केली. पक्षासाठी अनेक वर्ष काम करून देखील मंत्रिपद न मिळाल्याची खंत व्यक्त केली. याच नाराजीमुळे काही आमदारांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.

Congress MLAs resign amid rising dissent ahead of Karnataka cabinet expansion led by CM DK Shivakumar.
काँग्रेसचा सुपडासाफ! ऐतिहासिक विजय नोंदवून भाजपनं राखला १८ वर्षांचा बालेकिल्ला, कोणाला किती मिळाली मते?

कॅबिनेट विस्ताराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने 20 नव्या मंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून काही अनुभवी नेत्यांनाही पुन्हा जबाबदारी देण्यात आली. तसेच डी.के. शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळात ए.व्ही. गायत्री शांतिगौडा या महिला नेत्यांचाही समावेश करण्यात आला आहे.

Congress MLAs resign amid rising dissent ahead of Karnataka cabinet expansion led by CM DK Shivakumar.
By Election Results: भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त! प्रशांत किशोर यांचा दणदणीत विजय

मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या २० नेत्यांमध्ये पीएम नरेंद्रस्वामी, शिवराज थंगडगी, रुद्रप्पा लमाणी, के.एस. बसवनथप्पा, बी. नागेंद्र, रघुमूर्ती, जमीर अहमद खान, रिजवान अरशद, संतोष लाड, मधु बंगारप्पा, पुत्रंगा शेट्टी, मंकल वैद्य, अजय सिंह, एन. चालुवराय स्वामी, के.एम. शिवलिंगे गौडा, एच.सी. बालकृष्ण, बसवराज रायरेड्डी, गायत्री शांतिगौडा, विजयानंद काशनप्पनवर आणि लक्ष्मण सावदी यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com