महायुतीत पुन्हा खदखद! शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा तडकफडकी राजीनामा; काहीवेळातच हाती घेतलं कमळ

Internal Conflict Between BJP And Shinde Sena In KDMC Explained: कल्याण-डोंबिवलीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत वाद पुन्हा चिघळला आहे. शिंदे गटातील काही पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने महायुतीतील तणाव वाढला आहे.
Shinde Sena office bearers join BJP in Kalyan-Dombivli, highlighting rising internal tensions within the Mahayuti alliance.
Shinde Sena office bearers join BJP in Kalyan-Dombivli, highlighting rising internal tensions within the Mahayuti alliance.saam tv
Published On

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण डोंबिवलीत महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिंदे सेनेत यांच्यातील अंतर्गत वाद आणखी तीव्र होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता शिवसेना शिंदे गटातील काही पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत राजकीय चर्चांना उधाण आले आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अर्चित खडकूल यांनी आपल्या जुन्या पक्षावर गंभीर आरोप केले. शिवसेनेत आम्हाला योग्य वेळी पद देण्यात आले नाही.

Shinde Sena office bearers join BJP in Kalyan-Dombivli, highlighting rising internal tensions within the Mahayuti alliance.
SRA फ्लॅट मिळवून देण्याच्या आमिषाने लाटले ५.५७ कोटी; काँग्रेस खासदाराच्या पीएवर गुन्हा दाखल

पक्षासाठी काम करूनही आम्हाला सातत्याने डावलण्यात आले. एवढेच नाही, तर आमच्या एका पदाधिकाऱ्याला शिंदे गटाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने बैठकीतून हाकलून लावले. त्यामुळे आम्ही नाराज होतो आणि अखेर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असा आरोप खडकूल यांनी केला.

Shinde Sena office bearers join BJP in Kalyan-Dombivli, highlighting rising internal tensions within the Mahayuti alliance.
तुम्ही 10 घेतले, आम्ही 100 घेतले; पक्षप्रवेशावरून शिंदेसेना-भाजप आमने-सामने, महायुतीत अंतर्गत कलह उफाळला

यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही शिवसेना शिंदे गटावर अप्रत्यक्ष टीका करत, आमची चाल कासवासारखी असली तरी शेवटी विजय आमचाच होणार असा दावा केला. या विधानामुळे महायुतीतील दोन्ही पक्षांमधील शाब्दिक संघर्ष अधिकच तीव्र झाल्याचे चित्र दिसत होते. महापालिका निवडणुका जवळ येत असताना दोन्ही पक्षांतील पदाधिकाऱ्यांचे परस्पर पक्षांतर सुरू असल्याने महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com