SRA फ्लॅट मिळवून देण्याच्या आमिषाने लाटले ५.५७ कोटी; काँग्रेस खासदाराच्या पीएवर गुन्हा दाखल

Mumbai SRA Flat 5 Crore Fraud: मुंबईत SRA अंतर्गत PAP फ्लॅट मिळवून देण्याच्या आमिषाने ५.५७ कोटी रुपयांची कथित फसवणूक झाल्याप्रकरणी एका खासदाराच्या पीएवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मुंबई पोलीस पुढील तपास सुरू केला आहे.
Mumbai SRA Flat  5 Crore Fraud
Congress MP PA booked in ₹5.57 crore cheating casesaam tv
Published On
Summary
  • काँग्रेसच्या विद्यमान खासदाराच्या पीएविरोधात मुंबई पोलिसांनी FIR दाखल केला.

  • अंधेरी, सांताक्रूज, वांद्रे, कांदिवली आणि माटुंगा परिसरातील फ्लॅटचे आमिष दाखवल्याचा आरोप.

  • आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू असून प्रकरणाची सखोल चौकशी मुंबई पोलीस करत आहेत.

संजय गडदे, साम प्रतिनिधी

मुंबईत SRA अंतर्गत PAP (Project Affected Person) फ्लॅट मिळवून देण्याच्या आमिषाने तब्बल ५.५७ कोटी रुपयांची कथित फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तक्रारदार आकाश राधेश्याम सोनी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सुमारे ५,५७,५०,००० रुपयांच्या कथित फसवणुकीप्रकरणी FIR दाखल करून तपास सुरू केला आहे.

Mumbai SRA Flat  5 Crore Fraud
Maharashtra Politics: रायगडमध्ये राष्ट्रवादीचा भाजपला दे धक्का; बड्या नेत्यानं हाती बांधलं घड्याळ

तक्रारीनुसार, २०१७ मध्ये तक्रारदार आणि त्यांचे व्यावसायिक भागीदार रिअल इस्टेट व्यवसाय करत होते. त्याच काळात त्यांची शैलेश काकण आणि त्याच्या सहकाऱ्याशी ओळख झाली. त्यांनी SRA चे PAP फ्लॅट उपलब्ध करून देण्याचा दावा केला. तसेच स्वतःचे SRA अधिकारी आणि प्रभावशाली व्यक्तींशी संबंध असल्याचे सांगून अंधेरी, सांताक्रूज, वांद्रे, कांदिवली आणि माटुंगा परिसरात PAP फ्लॅट मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप आहे.

Mumbai SRA Flat  5 Crore Fraud
Pune : पुणे हादरलं! एकाच कुटुंबातील ३ जणांनी संपवलं आयुष्य; धक्कादायक कारण समोर

फ्लॅट मिळवून देण्यासाठी आरोपींनी वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी १५ लाख ते २८ लाख रुपये दर सांगितला. त्यानंतर तक्रारदार आणि त्यांच्या कंपनीमार्फत ४७ ग्राहकांकडून रक्कम गोळा करण्यात आली. विविध ग्राहकांकडून घेतलेली एकूण रक्कम ५,५७,५०,००० इतकी झाली. तक्रारीनुसार, आरोपींनी टोकन रक्कम तसेच हप्त्यांद्वारे सातत्याने पैसे घेतले. यामध्ये चेक आणि RTGS द्वारे झालेल्या अनेक आर्थिक व्यवहारांचाही उल्लेख करण्यात आला आहे.

तक्रारदाराचा आरोप आहे की आरोपींनी SRA च्या लेटरहेडवरील कथित वाटपपत्रे, आदेशांच्या प्रती, कलेक्टरांची पत्रे, सक्षम प्राधिकरणाची पत्रे, सोसायटी NOC, वीजबिले आणि इतर शासकीय कागदपत्रे दिली. मात्र, नंतर SRA कार्यालयात या कागदपत्रांची पडताळणी केली असता ती कथित बनावट असून शासकीय नोंदींशी जुळत नसल्याचे सांगण्यात आले.

SRA अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर प्रकार उघड

२०२४ मध्ये तक्रारदारांनी SRA च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. तपासादरम्यान सादर करण्यात आलेली कागदपत्रे खरी नसल्याचे कथितरीत्या समोर आले. त्यानंतर तक्रारदारांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.या FIR मध्ये शैलेश काकण, रूपेश वेलेंकर, अभिषेक गुजर, विश्वनाथ जाधव यांच्यासह अन्य काही जणांची मुख्य आरोपी म्हणून नावे नमूद करण्यात आली आहेत. PAP फ्लॅट मिळवून देण्याच्या नावाखाली सर्वांनी संगनमताने फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, विश्वनाथ जाधव, जो यापूर्वी शिवसेना पक्षाच्या एका आमदाराचा वैयक्तिक सचिव होता आणि सध्या काँग्रेसच्या एका विद्यमान खासदाराचा वैयक्तिक सचिव म्हणून कार्यरत असल्याचे नमूद आहे, त्याने २५ लाख रुपयांच्या मोबदल्यात घर मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. विश्वनाथ जाधव याच्याविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून आर्थिक व्यवहार, कागदपत्रांची सत्यता आणि आरोपींची भूमिका यांचा सखोल तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com