

रायगडमध्ये भाजपला मोठा धक्का; राजेश लाड आणि सुरेश लाड राष्ट्रवादीत दाखल.
भाजपचे कर्जत शहराध्यक्ष असलेले राजेश लाड यांनी अजित पवार गटाची साथ स्वीकारली.
खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
निवडणुकीच्या काळात भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग झाली. मात्र आता भाजपमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलंय. अनेक ठिकाणी पक्षात संघर्ष सुरू असल्याची चर्चा रंगत असते. छत्तीसगडमध्ये भाजपच्या १०० कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामा दिल्याची घटना ताजी असतानाच महाराष्ट्रातील रायगडमध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय. माजी आमदार सुरेश लाड आणि पुतणे राजेश लाड यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय.
राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीनं भाजपचा नेता पळवल्यानं कर्जत तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. राजेश लाड यांनी सुधाकर घारे यांच्या नेतृत्वात पक्ष प्रवेश केलाय. या पक्षप्रवेशावेळी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे हे उपस्थित होते. हा पक्षप्रवेश सोहळा सुतारवाडी येथे पार पडला. राजेश लाड हे भाजपचे कर्जत शहर अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. ते कर्जत नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राहिले आहेत.
कर्जत शहर भाजपचे मंडळ अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष राजेश लाड यांनी आपल्या अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. पक्षातील तीव्र गटबाजी आणि वरिष्ठ नेत्यांचे याकडे असलेले दुर्लक्ष याला कंटाळूनच लाड यांनी राजीनामा दिला होता.आज अखेर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केलाय. कर्जत भाजपमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून दोन प्रबळ गट सक्रिय आहेत.
कर्जत नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांपासून हे दोन्ही गट एकमेकांवर कुरघोडी करत असतात. एकमेकांची पाय ओढण्याची ते एकही संधी सोडत नव्हते. पक्षातील या उघडउघड गटबाजीचा थेट फटका भाजपला बसलाय. शहर आणि तालुका पातळीवर पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या संपूर्ण अनास्थेला कंटाळूनच राजेश लाड यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जातंय. यावरून कर्जत गटबाजी रोखण्यात आणि कार्यकर्त्यांना एकत्र बांधून ठेवण्यात भाजप पक्षातील वरिष्ठ नेते पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप होतोय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.