Shocking: बंद कारमध्ये आढळले दोघांचे मृतदेह अन् दारू, दार उघडताच पोलिसही चक्रावले; परिसरात खळबळ

Mystery Deaths in Delhi: दिल्लीमध्ये एका कारमध्ये दोघांचे मृतदेह आढळले. कुजलेल्या अवस्थेत हे मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली. दिल्ली पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Mystery Deaths in Delhi
Delhi News Saam Tv
Published On

Summary -

  • दिल्लीमध्ये बंद कारमध्ये दोन मृतदेह आढळले

  • कारमध्ये दारूच्या बाटल्या देखील आढळल्या

  • दोघांची हत्या झाली की त्यांनी आत्महत्या केली याचा तपास सुरू आहे

  • दोघांचा गुदमरल्यामुळे मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज

Delhi News: दिल्लीमध्ये बंद कारमध्ये दोन जणांचे मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. दिल्लीच्या एनआयए परिसरातील खेडा गावातली ही घटना आहे. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारचे दरवाजे उघडले तर कारमध्ये दारूच्या बाटल्या आणि दोघांचे मृतदेह आढळले. त्यानंतर पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन्ही मृतदेहांची ओळख पटवण्यात यश आले आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले की दोन्ही मृत्यू झालेल्या व्यक्ती एकाच खेडा खुर्द गावातील रहिवासी होते. विकास (४२ वर्षे) आणि विजेंद्र (३६ वर्षे) अशी मृतांची नावं होती. दोघांचा मृत्यू नेमका कसा झाला? ही हत्या आहे की आत्महत्या? तसंच त्यांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी बोलावण्यात आले. फॉरेन्सिक टीमने संपूर्ण परिसरातून पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आणि कार आणि आजूबाजूच्या परिसराची बारकाईने तपासणी केली. दोघांचा मृत्यू कसा झाला याचा तपास पोलिस करत आहेत.

Mystery Deaths in Delhi
Shocking: नवऱ्याचे गर्लफ्रेंडसोबत शरीरसंबंध, बायकोने नको त्या अवस्थेत पकडलं; व्हिडीओ काढला अन्...

प्राथमिक माहितीनुसार मृतदेहांजवळ कोणतीही असामान्य परिस्थिती आढळली नाही. परंतू सर्व पैलू विचारात घेऊन या प्रकरणाचा तपास केला जात आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे. स्थानिक नागरिक चिंतेत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी सुरक्षा वाढवली आहे. कोणताही गोंधळ टाळण्यासाठी आणि शांततेत तपास पार पडावा यासाठी परिसरातील शाळा, बाजारपेठा आणि आजूबाजूच्या सार्वजनिक ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढवला. पोलिसांनी परिसरातील रहिवाशांना अफवांकडे दुर्लक्ष करून तपासात सहकार्य करण्याचे आवाहन केले.

Mystery Deaths in Delhi
Shocking : शिक्षकी पेशाला काळिमा! ५ विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे, भंडाऱ्यातील संतापजनक प्रकार

पोलिसांनी पुढे असेही सांगितले की, कारमध्ये तीन दारूच्या बाटल्या होत्या. त्यामधील एक दारूची बाटली उघडण्यात आली होती तर दोन सील बंद होत्या. कारच्या सर्व काचा बंद करण्यात आल्या होत्या. मृतदेहांवर जखमा आढळून आल्या नाहीत. पण कारच्या आतमधून दुर्गंधी येत होती. याचाच अर्थ हे मृतदेह बऱ्याच काळापासून कारमध्ये होते. त्यामुळे ते कुजण्यास सुरूवात झाली होती. कदाचित या दोघांचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर सत्य समोर येईल.

Mystery Deaths in Delhi
Shocking : ११ वर्षांच्या मुलाचा धक्कादायक कारनामा; AI आणि Youtubeचा सल्ला घेऊन रचला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com