Actress Arrested: हॉलिवूडमधील प्रसिद्ध पॉप सिंगर ब्रिटनी स्पीयर्स पुन्हा एकदा कायदेशीर अडचणीत सापडली आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये दारू आणि ड्रग्स घेऊन गाडी चालवल्याच्या संशयावरून पोलिसांनी तिला अटक केली. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय मनोरंजन विश्वात मोठी चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास कॅलिफोर्नियातील व्हेंचुरा काउंटी परिसरात पोलिसांनी तिची कार थांबवली. वाहन चालवताना ती मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आणि पुढील चौकशीसाठी अटक केली.
अमेरिकन कायद्यानुसार मद्य किंवा ड्रग्सच्या नशेत वाहन चालवणे हा गंभीर गुन्हा मानला जातो. त्यामुळे पोलिसांनी तिच्यावर “ड्रायव्हिंग अंडर द इन्फ्लुएन्स” (DUI) या आरोपाखाली कारवाई केली. या घटनेनंतर काही वेळ चौकशी करण्यासाठी एक रात्र पोलिस स्टेशनला ठेवल्यानंतर तिला सोडण्यात आले या प्रकरणाची चौकशी अद्याप सुरू असून, पोलिसांनी तिच्या कारची तपासणी तसेच काही नमुन्यांची चाचणी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी आता न्यायालयात होणार आहे. न्यायालयाने या प्रकरणासाठी ४ मे २०२६ ही तारीख निश्चित केली असून त्या दिवशी तिला कोर्टात हजर राहावे लागणार आहे.
गेल्या काही वर्षांतही ब्रिटनी स्पीयर्स तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आली होती. विशेषतः १३ वर्षे चाललेल्या तिच्या कन्झर्वेटरशिप प्रकरणानंतर ती पुन्हा सिंगल आहे. मात्र आता झालेल्या या घटनेमुळे तिचे नाव पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात आले आहे. तिने तिचे इंस्टाग्राम अकाउंट डिलीट केल्याचे बोलले जात आहे. तिला इंस्टाग्रामवर ४२ दशलक्ष लोक फॉलो करतात.
ब्रिटनी स्पीयर्सचे शेवटचे गाणे
ब्रिटनी स्पीयर्स हे संगीत विश्वातील एक मोठं नाव आहे. तिने १९९८ मध्ये गायन क्षेत्रात पदार्पण केले. तिने एकामागून एक हिट गाणी दिली. "आय वाना गो", "टॉक्सिक", "बेबी वन मोर टाईम" आणि "क्रेझी" ही तिची काही लोकप्रिय गाणी आहेत. तिला पॉप आयकॉन मानले जाते आणि जगभरात तिचे चाहते खूप आहेत. २०२४ मध्ये तिने जाहीर केले की तिने संगीत विश्वात काम करणे थांबवले. २०२२ मध्ये प्रदर्शित झाले 'होल्ड मी क्लोजर' हे तिचं शेवटचं गाणं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.