Death News: हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज निर्माता कालवश, अभिनेत्याने लिहिली हृदयद्रावक पोस्ट

Death News: प्रसिद्ध निर्मात्याचे निधन झाले आहे. वडिलांच्या निधनानंतर करणवीर बोहरा खूपच भावनिक झाला आहे. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे.
Actor Karanvir Bohras father and producer Mahendra Bohra passes away
Actor Karanvir Bohras father and producer Mahendra Bohra passes away Saam Tv
Published On

Death News: "कसौटी जिंदगी की" या मालिकेतील प्रसिद्ध कलाकार करणवीर बोहराचे वडील प्रसिद्ध निर्माते महेंद्र बोहरा यांचे निधन झाले आहे. ते एक प्रसिद्ध निर्माते होते. वडिलांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करताना करणवीरने बुधवारी इंस्टाग्रामवर वडिलांसाठी एक खास इमोशनल पोस्ट लिहिली आहे.

पोस्टमध्ये काय आहे?

करणवीर बोहराने इंस्टाग्रामवर वडिलांचा फोटो शेअर करत लिहिले, "तुम्हाला खूप प्रेम बाबा. मला तुमची खूप आठवण येईल. ज्यांनी आपले आई-वडिल गमावले आहेत त्यांना माहित आहे की हा त्रास काय आहे. या वेदनेमध्येही, तुम्ही एक पूर्ण, सुंदर जीवन जगलात हे जाणून मला शांती मिळते. तुम्ही आम्हाला नेहमी जसे हवे होते तसेच दिले. शांतपणे आणि कोणत्याही वेदनाशिवाय. तुम्ही म्हणायचात की तुम्हाला तुमचे बूट घालून या जगाचा निरोप घ्यायचा आहे आणि नेमकं तसंच झालं."

Actor Karanvir Bohras father and producer Mahendra Bohra passes away
Thalapathy Vijay: एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा, दुसरीकडे थलापती विजय-त्रिशाची लग्नात एकत्र एन्ट्री, व्हिडिओ आला समोर

वडिलांनी आम्हाला खूप काही शिकवलं

करणवीरने पुढे लिहिले, "तुम्ही दीदी आणि मला खरोखर महत्त्वाची शिकवण दिलीत. जीवन कितीही कठीण असले तरी, होप टिकवून ठेवणे. पडल्यावर पुन्हा उठा. कधीही हार मानू नका. तुम्ही मला स्वप्न पहायला शिकवलत त्यासाठी थँक्यू.

Actor Karanvir Bohras father and producer Mahendra Bohra passes away
Bigg Boss Marathi 6: बिग बॉसमध्ये नवा ट्विस्ट; वाइल्डकार्ड संकेत ठरला 'किंग', राखी सांवतला दिली कॅप्टनशिप

महेंद्र बोहरा हे अनेक दशकांपासून हिंदी चित्रपटसृष्टीशी जोडलेले होते. "तेजा" आणि "टक्कर" सारख्या चित्रपटांसाठी ते प्रसिद्ध होते. महेंद्र बोहरा हे दिग्गज चित्रपट निर्माते रामकुमार बोहरा यांचे पुत्र होते. त्यांनी सोनाली बेंद्रे, सुनील शेट्टी आणि नसीरुद्दीन शाह सारख्या अनेक स्टार्ससोबत चित्रपट बनवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com