Political News: मोठी बातमी! निवडणुकीआधीच भाजपला मोठं यश, ७७ उमेदवार बिनविरोध विजयी

Tripura Election: त्रिपुरामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली. निवडणुकीआधीच ७७ उमेदवार बिनविरोध विजयी झाले.
Political News: मोठी बातमी! निवडणुकीआधीच भाजपला मोठं यश,  ७७ उमेदवार बिनविरोध विजयी
Tripura ElectionSaam tv
Published On: 

त्रिपुरामध्ये निवडणुकीआधी भाजपला मोठं यश मिळाले आहे. २७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचे ७७ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. गेल्या मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर त्रिपुरा राज्य निवडणूक आयोगाने सत्ताधारी भाजपचे ७७ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच भाजपने ७७ जागांवर आघाडी मिळवली. त्यामुळे या निवडणुकीत भाजपच बाजी मारेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

त्रिपुरा राज्य निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण त्रिपुरा जिल्ह्यातील शांतीर बाजार, पश्चिम त्रिपुरा जिल्ह्यातील रणीर बाजार आणि धलाई जिल्ह्यातील कमालपूर, जिरानिया आणि मोहनपूर या ५ नगरपालिकांच्या ६५ जागांवर इतर कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवार दिला नाही. कोणताही उमेदवार रिंगणात नसल्यामुले भाजपचे सर्व ६५ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यासोबतच धलाई जिल्ह्यातील अंबासा, सिपाहिजाला जिल्ह्यातील बिशालगढ आणि खोवाई जिल्ह्यातील तेलियामुरा या ३ नगरपालिकांमध्ये भाजपच्या उमेदवारांनी १२ जागा जिंकल्या.

Political News: मोठी बातमी! निवडणुकीआधीच भाजपला मोठं यश,  ७७ उमेदवार बिनविरोध विजयी
BJP vs Shivsena : माझ्याकडे रामदास कदमांच्या सिक्रेट क्लिप्स; 'फोटो बॉम्ब'नंतर भाजपचा खळबळजनक इशारा

विरोधी पक्ष सीपीआयएम आणि काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपच्या निवडणुकीपूर्वीच्या विजयावर आरोप केला. दोन्ही पक्षाने सांगितले की, सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी विरोधी उमेदवारांना धमक्या दिल्या. या उमेदवारांना भाजपकडून धमकावण्यात आले जेणेकरून ते या ५ नगरपालिकांच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकणार नाहीत. सीपीआयएमचे त्रिपुरा राज्य सचिव आणि विरोधी पक्षनेते जितेंद्र चौधरी यांनी भाजपवर गंभीर आरोप करत सांगितले की, डाव्या उमेदवारांना निवडणूक लढवण्यापासून रोखण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या पक्षाचे नेते, उमेदवार आणि समर्थकांवर हल्ला केला.

Political News: मोठी बातमी! निवडणुकीआधीच भाजपला मोठं यश,  ७७ उमेदवार बिनविरोध विजयी
BJP News: भाजप नेत्याचा मित्रांनीच केला घात, भररस्त्यात गोळ्या झाडून संपवलं, हत्येमागचं धक्कादायक कारण समोर

२७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या त्रिपुरा शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सीपीआयएम आणि काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला होता. दोन्ही पक्षांमध्ये अनेक बैठका झाल्या. अनेक वेळा चर्चा करून कोणताही सकारात्मक निर्णय झाला नाही. दोन्ही पक्षांमध्ये एकत्र निवडणूक लढवण्याबाबत निर्णय झालाच नाही. दरम्यान, त्रिपुरामध्ये होणाऱ्या या निवडणुका राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. २७ नोव्हेंबर रोजी त्रिपुराच्या ८ जिल्ह्यांमधील २१ पैकी १६ शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या निवडणुका होणार आहेत. या आधी भाजपने त्रिपुरा विधानसभा पोटनिवडणुका जिंकल्या होत्या .

Political News: मोठी बातमी! निवडणुकीआधीच भाजपला मोठं यश,  ७७ उमेदवार बिनविरोध विजयी
Former BJP MP: 2 वेळा खासदार राहिलेल्या भाजपच्या नेत्याचं निधन, राजकीय वर्तुळात हळहळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.