

सोलापूरमध्ये भाजप नेते प्रतापसिंह करचे यांची हत्या
भाजप नेत्याच्या हत्या प्रकरणात दोन मित्रांना अटक
भाजप नेत्याच्या हत्येमागे आर्थिक व्यवहाराचा वाद असल्याची माहिती समोर
सोलापूरमध्ये भाजपच्या नेत्याची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. प्रतापसिंह करचे असं असं हत्या झालेल्या भाजप नेत्याचे नाव होते. भाजप नेत्याच्या हत्याप्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू असून हत्येमागचं धक्कादायक कारण समोर आले आहे. मित्रांनीच त्यांचा घात केला आणि मध्यरात्री कार अडवून त्यांच्यावर गोळ्या झाडून हत्या केली. शिंदेसेनेच्या नेत्यावर याप्रकरणी आरोप केले जात आहेत.
सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील भाजप युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष प्रतापसिंह करचे यांची २७ ऑक्टोबर रोजी हत्या करण्यात आली होती. मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास सांगोल्यातील तिप्पेहळ्ळी परिसरात त्यांची हत्या करण्यात आली. प्रतापसिंह करचे यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या मित्रांनीच त्यांची हत्या केली. हर्षवर्धन ऐवळे आणि विक्रम घरडे यांनी सोबत आणलेल्या बंदुकीतून गोळ्या झाडत प्रतापसिंह यांना संपवले. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.
आरोपी हर्षवर्धन ऐवळे आणि विक्रम घरडे हे प्रतापसिंह करचे यांचे मित्र आहेत. आपल्या मित्राचाच त्यांनी काटा काढत हत्या केल्याने सोलापूरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आर्थिक व्यवहार आणि जमीन -खरेदी विक्रीच्या वादातूनच दोघांनी त्यांची हत्या केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. दोन्ही आरोपी प्रतापसिंह यांच्या गावातीलच आहेत आणि त्याचे जवळचे मित्र असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस सध्या आरोपींची कसून चौकशी करत आहेत.
प्रतापसिंह करचे यांच्या हत्येला आठवडा होत आला तरी देखील त्याच्या हत्येमागच्या मास्टरमाइंडला अटक करण्यात आली नाही. या हत्येमागे शिंदेसेनेच्या नेत्याचा हात असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. प्रतापसिंह करचे यांच्या पत्नी अर्चना यांनी शिंदेसेनेच्या नेत्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करत त्यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी केली. त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, आटपाडी येथील शिंदेसेनेचे नेते आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तानाजी पाटील, त्यांचे भाऊ शिवाजी पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील यांनी कट रचून सुपारी देऊन प्रतापसिंह यांची हत्या घडवून आणल्याची लेखी तक्रार अर्चना करचे यांनी सोलापूरच्या जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.