

इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर भीषण अपघात
बस आणि इंधन टँकरची समोरासमोर धडक
आगीमध्ये १६ प्रवाशांचा होरपळून मृत्यू
इंडोनेशियामध्ये भीषण अपघातामध्ये १६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर बुधवारी ही घटना घडली. याठिकाणी महामार्गावर भरधाव इंधन टँकर आणि प्रवासी बसची समोरसमोर धडक झाली. या भीषण अपघातानंतर भडका उडाला. आगीमध्ये होरपळून बसमधील १६ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर ४ जण गंभीर जखमी झाले. जखमी प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात नेमका कसा झाला याचा तपास पोलिस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात दक्षिण सुमात्रा प्रांतातील करांगा जया जिल्ह्यातील ट्रान्स-सुमात्रा महामार्गावर दुपारी १२:३९ च्या सुमारास हा अपघात झाला. स्थानिक वृत्तसंस्था 'जकार्ता ग्लोब'च्या वृत्तानुसार, विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका प्रवासी बसची इंधन टँकरला जोरदार धडक ट्रकशी टक्कर झाली. या अपघातानंतर टँकर आणि बसला भीषण आग लागली.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या गाड्या देखील घटनास्थळी दाखल झाल्या पण तोपर्यंत उशिर झाला. आग वाढत गेली आणि या आगीमध्ये संपूर्ण बस आणि टँकर जळून खाक झाला. या आगीमध्ये होरपळून १६ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर ४ जण गंभीर जखमी झाले. जखमींमधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.