Accident News : अक्कलकोट–गाणगापूर महामार्गावर भीषण अपघात! डंपरच्या जोरदार धडकेत एसटी बसचा चक्काचूर; दोघांचा जागीच मृत्यू

Solapur Akkalkot Accident News : अक्कलकोट–गाणगापूर महामार्गावर एसटी बस आणि डंपरमध्ये भीषण अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू तर अनेक जण गंभीर जखमी झाले. पोलिसांकडून तपास सुरू आहे.
AKKALKOT BUS DUMPER ACCIDENT: TWO DEAD, SEVERAL INJURED ON GANAGAPUR HIGHWAY
AKKALKOT BUS DUMPER ACCIDENT: TWO DEAD, SEVERAL INJURED ON GANAGAPUR HIGHWAYSaam Tv
Published On
Summary
  • अक्कलकोट–गाणगापूर महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक

  • अपघातात दोन जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी

  • धडकेनंतर डंपरला आग लागल्याने परिस्थिती गंभीर

  • पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली

  • अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू

अक्कलकोट तालुक्यातील दुधनीजवळील रुद्देवाडी गावाजवळ अक्कलकोट–गाणगापूर महामार्गावर आज सकाळी भीषण अपघात घडला. एसटी बस आणि मुरूमने भरलेल्या डंपरमध्ये झालेल्या जोरदार धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अक्कलकोटहून गाणगापूरकडे प्रवासी घेऊन जाणारी एसटी बस नियमित प्रवास करत असताना समोरून येणाऱ्या डंपरने अचानक नियंत्रण सुटल्यामुळे बसला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की एसटी बसच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातानंतर काही क्षणातच डंपरने पेट घेतल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली

AKKALKOT BUS DUMPER ACCIDENT: TWO DEAD, SEVERAL INJURED ON GANAGAPUR HIGHWAY
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर 'नो क्लिक', सेल्फी-फोटो काढणं महागात पडणार, थांबलात तर गुन्हा दाखल होणार

अपघाताच्या वेळी बसमध्ये प्रवासी होते. धडकेमुळे अनेक प्रवासी सीटवरून खाली फेकले गेले. काही प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या असल्या तरी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना बाहेर काढले आणि रुग्णवाहिकांच्या सहाय्याने अक्कलकोट येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.

AKKALKOT BUS DUMPER ACCIDENT: TWO DEAD, SEVERAL INJURED ON GANAGAPUR HIGHWAY
Gold Rate : ग्राहकांसाठी खुशखबर! सोने - चांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या 22k 24k 18k चे दर

या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. अपघातानंतर काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. माहिती मिळताच दक्षिण अक्कलकोट पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतले.

AKKALKOT BUS DUMPER ACCIDENT: TWO DEAD, SEVERAL INJURED ON GANAGAPUR HIGHWAY
Shocking : मुंबई हादरली! गार्डनमध्ये खेळणाऱ्या ९ वर्षीय मुलीसोबत पोलीस अधिकाऱ्याचे अश्लील वर्तन, प्राव्हेट पार्टही दाखवला

दरम्यान, या भीषण अपघाताचे नेमके कारण काय, याचा तपास पोलीस करत आहेत. प्राथमिक अंदाजानुसार डंपर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून वाहनचालकांनी अधिक सतर्कतेने वाहन चालवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com