

भेसळयुक्त दूध पिल्याने चार जणांचा मृत्यू झालाय
दुधामध्ये डिटर्जंट आणि युरिया मिसळल्याचा आरोप करण्यात येत आहे
पूर्व गोदावरी जिल्ह्यातील राजामहेंद्रवरममध्ये घडली घटना
दूध पिऊन चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर १२ जण प्रकृती गंभीर झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आंध्रप्रदेशच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातील राजामहेंद्रवरम भागातील या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री चंद्रबाबाबू नायडू यांनी मृतांच्या नातेवाईकांना १०-१० लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दूधामध्ये डिटर्जेंट आणि युरियासारखे पदार्थ मिसळले जात होते. अनधिकृत दूध विक्रेत्याकडून भेसळयुक्त दूध प्यायल्याने लोक आजारी पडू लागले. काही दिवसांपूर्वी भेसळयुक्त दूध प्यायल्याने रुग्णालयात ५ जणांची प्रकृती गंभीर झाली. त्यानंतर भेसळयुक्त दूध विक्रीचा भंडाफोड झाला. काही दिवसांनी रुग्णांची संख्या वाढली. भेसळयुक्त दूधामुळे रुग्णांना मूत्रपिंडाचा आजार झाला. या रुग्णापैकी १६ फेब्रुवारी रोजी दोघांचा मृत्यू झाला. काही दिवसांनी आणखी दोघांचा मृत्यू झाला.
भेसळयुक्त दूध पिऊन मृत्यू झालेल्या लोकांची नावे समोर आली आहेत. एन शेषगिरी राव (७२), राधाकृष्ण मूर्ती (७४), ताडी कृष्णावेनी (७६) आणि ताडी रमानी (५८) असे मृतांची नावे आहेत. कृष्णावेनी आणि रमानी यांचा मृत्यू रविवारी झाला. तर इतर दोन रुग्णांचा सोमवारी मृत्यू झाला. भेसळयुक्त दूध प्यायल्याने रुग्णांना उलटी, पोटदुखी, मूत्रपिंडाशी संबंधित आजार झाले.
१२ जण रुग्णालयात दाखल
भेसळयुक्त दूधामुळे रुग्णालयात आणखी १२ जणांवर उपचार सुरू आहेत. पीडित कुटुंबाच्या तक्रारीवरून पोलिसांनी डेअरी मालकाला ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी पीडित कुटुंबीयाच्या घरातून दुधाचा नमूना हैदराबाद आणि विशाखापट्टनम येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. पीडित कुटुंबातील सदस्यांकडून डेअरी मालकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.