uttar pradesh viral news
Divorce after one day Saam tv

लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरीने नवऱ्याला सिक्रेट सांगितलं; सकाळी दोघांचा घटस्फोट, अचानक नेमकं काय घडलं?

Divorce after one day : लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरीने सिक्रेट सांगितलं. त्यानंतर सकाळी दोघांचा घटस्फोट झाला.
Published on
Summary

लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरीने दिली प्रेमाची कबुली

नवरीने जबरदस्तीने लग्न लावल्याचा केला आरोप

दुसऱ्या दिवशी नवरी थेट पोलीस ठाण्यात पोहोचली

उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यात गोहांड गावात लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नवरीने नवऱ्यासोबत नांदायला नकार दिला. त्यानंतर नवी नवरी थेट पोलीस स्टेशनला पोहोचली. राठ पोलीस स्टेशनला पोहोचली. त्यानंतर पोलिसांना बॉयफ्रेंडसोबत राहायची इच्छा व्यक्त केली . यावेळी नातेवाईकांनी बळजबरी आणि मारहाण करून लग्न लावल्याचा आरोप नवरीने केला.

नवरीच्या आरोपानंतर गावात पोलिसांच्या उपस्थितीत पंचायत बसली. दोन्ही पक्षाच्या सहमतीने दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. अवघे काही तास टिकलेलं लग्न कायद्याने रद्द झालं.

uttar pradesh viral news
अजितदादांच्या विमानातील ब्लॅकबॉक्स सुरक्षित; महत्त्वाची माहिती समोर

हमीरपूरच्या राठ हद्दीतील ही घटना आहे. बुद्ध सिंह यांची मुलगी मिथिलेश कुमारीचं लग्न गोहांड गावातील तरुणाशी झालं. नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न झाल्यानंतर पहिल्या रात्री मिथिलेश कुमारी सासरी पोहोचली. बंद खोलीत नवरा-बायको होते. लग्नाच्या पहिल्या रात्री बायकोने नवरा धरम सिंहला सिक्रेट सांगितलं.मिथिलेशने सांगितलं की, 'माझं दुसऱ्या तरुणाशी प्रेम आहे. लग्न माझ्या मर्जीविना झालं आहे' रात्री नवऱ्याला सिक्रेट सांगितल्यानंतर सकाळी बायको पोलीस स्टेशनला पोहोचली. या घटनेची गावात एकच चर्चा सुरू झाली.

uttar pradesh viral news
राज्यात राजकीय घडामोडींना वेग; मुख्यमंत्र्यांनी तातडीने बोलावली मंत्रिमंडळाची बैठक, VIDEO

नवरीच्या निर्णयाने नवरा धरम आणि कुटुंब सु्न्न झालं. नवऱ्याने म्हटलं की, नवरीला लग्न करण्याची इच्छा नव्हती. तर आधीच सांगायला पाहिजे होते. मला आधीच या गोष्टी सांगितल्या असत्या. तर माझ्या कुटुंबाला या बदनामीचा सामना करावा लागला नसता. या घटनेने सामाजाच नाचक्की झाल्याचेही त्याने सांगितले.

uttar pradesh viral news
पुण्यात मोठा राडा; काँग्रेस नेत्याला हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

पोलिसांनी सांगितलं की, आम्ही नवरीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु तिने घटस्फोटाच्या निर्णयावर ठाम राहिली. त्यामुळे दोन्ही कुटुंबाच्या सहमतीने घटस्फोटाचा निर्णय घेतला. दोघे एकमेकांपासून वेगळे झाल्यानंतर नवरी तिच्या आई-वडिलांच्या घरी गेली'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com