पश्चिम बंगालच्या हावडा जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याच्या अटकेच्या व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. पोलीस अटक करतील या भीतीने टीएमसी नेता हा एका दुकानात जाऊन स्टोअररूममध्ये साड्यांच्या ढिगाऱ्याखाली लपला होता, पण तो त्यांच्या नजरेतून सुटू शकलेला नाही. पोलिसांनी त्याला या ढिगाऱ्यातून काढून त्याच्या मुसक्या आवळल्या.
ही घटना हावडा येथे घडली असून ब्रम्हानंद चक्रवर्ती असे या तृणमूल काँग्रेसच्या नेत्याचे नाव असून त्याच्यावर सरकारी गृहनिर्माण योजनेच्या निधीतून पैसे घेतल्याचा आणि खंडणी उकळल्याचा आरोप केला होता. याबाबत नागरिकांनी तक्रार दिली आणि ब्रम्हानंदवर गुन्हा दाखल झाला. यानंतर पोलिस अटक करण्यासाठी गेले असता तो लपवाछपवीचे डाव खेळायला लागला.
अटक टाळण्यासाठी ब्रह्मानंद चक्रवर्ती एका कपड्यांच्या दुकानात साड्यांच्या मोठ्या ढिगाऱ्याखाली लपला होता. पोलिसांनी जेव्हा झाडाझडती घेतली आणि साड्यांचा ढिगारा हटवला, तेव्हा त्यांना ब्रह्मानंद चक्रवर्ती त्या ढिगाऱ्याखाली लपलेला आढळून आला. पोलिसांनी त्याला अटक केली. या संपूर्ण कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सूत्रांनुसार, २०२१ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या राजकीय हिंसाचाराशी संबंधित आरोपही ब्रह्मानंद चक्रवर्तीवर आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.