Manasvi Choudhary
टेक कपंनी मेटाने सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म इंस्ट्राग्राम अॅपसाठी नवीन सब्सक्रिप्शन प्लॅन लॉन्च केला आहे. या कंपनीने इन्स्टाग्रामसाठी पेड सब्सक्रिप्शन टियर रोलआउट केले आहे. ज्याचे इन्स्टाग्राम प्लस असे नाव आहे.
ज्या युजर्सना इन्स्टाग्रामवर एक्स्ट्रा कंट्रोल्स, उत्तम इनसाइट्स पाहिजे आहेत अश्या युजर्ससाठी इन्स्टाग्राम प्लस ऑप्शनल लॉन्च झाले आहे.
इन्स्टाग्राम प्लची किंमत 299 रूपये प्रति महिना ठेवण्यात आली आहे. इन्स्टाग्राम प्लसमध्ये स्टोरीवर जास्त लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यांची स्टोरी किती लोकांना पुन्हा पाहिली आहे. हे युजर्स पाहू शकणार आहेत.
१) यूजर्स क्लोज फ्रेंड्स फीचरव्यतिरिक्त अनलिमिटेड स्टोरी ऑडियंस लिस्ट तयार करू शकता.
२) इंस्टाग्राम प्लस सब्सक्राईबर्सना त्यांच्या स्टोरी किती जणांनी पुन्हा पाहिली याची माहिती पाहता येणार आहे.
३) या प्लॅनमध्ये स्टोरीची कालमर्यादा 24 तासांवरून 48 तासांपर्यंत वाढवण्याची आणि गुपचूप स्टोरी प्रीव्ह्यू करण्याची सुविधा मिळणार आहे.
४) इन्स्टाग्राम प्लस यूजर्स फॉलोअर्सच्या फीडमध्ये न दिसता थेट प्रोफाईल आणि हाइलाइट्समध्ये पोस्ट करू शकणार आहेत.
५) इन्स्टाग्राम प्लसमध्ये केवळ स्टोरी अपग्रेडच नाही तर मेडा पेड सब्सक्राईबर्ससाठी अनेक कॉस्मेटिक अपग्रेड्स देखील जोडणार आहे.
६) यूजर्सना प्रोफाईल पिन्डसचा पर्याय मिळणार आे. ज्यामध्ये सहा पोस्ट पिन करू शकणार आहेत ज्यामुळे महत्वाचा कन्टेट हायलाईट होईल.