Manasvi Choudhary
मुंबईकरांसाठी हाकेच्या अंतरावर ठाणे- कल्याणमध्ये फिरण्यासाठी थंड हवेची प्रसिद्ध ठिकाणे आहेत.
कामाच्या धावपळीतून वेळ मिळत नसल्यास तुम्ही देखील वन डेचा प्लान करत असाल तर ठाणे- कल्याण हे ठिकाण बेस्ट आहे.
उन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुलांसोबत तुम्ही पिकनीकचा प्लान करत असाल तर तुम्ही खालील 5 ठिकाणांना अवश्य भेट द्या.
ठाण्यापासून जवळ असलेल्या कल्याण येथे दुर्गाडी किल्ला आहे. या किल्ल्याला ऐतिहासिक वारसा आहे. लहान मुलांना घेऊन तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकता.
लवासा हे महाराष्ट्रातील थंड हवेचे प्रसिद्ध ठिकाण म्हणून ओळखले जाते. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही या ठिकाणी पिकनीकचा प्लान करा.
संजय गांधी नॅशनल पार्क हे लहान मुलांसाठी सहलीचे ठिकाण आहे. या उद्यानात तुम्ही माकडे, सिंह, वटवाघुळे हे प्राणी पाहता येतील.
इगतपुरी हे निसर्ग समृद्धीने नटलेला परिसर आहे. ट्रेकर्ससाठी इगतपुरी हे ठिकाण आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. उन्हाळ्यातही या ठिकाणी थंड हवा असते.
कल्याणजवळ मलंगगड हा किल्ला आहे. अनेक पर्यटक या किल्ल्याला भेट देतात. डोंगराळ भागात असलेला हा किल्ला ऐतिहासिक वारसा जपतो आहे. उन्हाळ्यात या ठिकाणी गेल्यानंतर आजूबाजूचा परिसर थंडगार वाटतो.