Raigad Crime: रायगड हादरले! मुंबईवरून गावी आलेल्या १५ वर्षीय मुलीची हत्या, धारदार शस्त्राने डोक्यावर वार नंतर गळा आवळला

15 Years Old Girl Killed In Raigad: रायगडमध्ये १५ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली. जंगलामध्ये तिचा मृतदेह आढळून आला होता. या मुलीची धारदार शस्त्राने वार करत आणि गळा आवळून संपवण्यात आले.
Raigad Crime: रायगड हादरले! मुंबईवरून गावी आलेल्या १५ वर्षीय मुलीची हत्या, धारदार शस्त्राने डोक्यावर वार नंतर गळा आवळला
Raigad Crime SAAM TV
Published On
  • रायगडमध्ये मुंबईच्या मुलीची हत्या

  • १५ वर्षीय मुलीची धारदार शस्त्राने वार करत हत्या

  • पोलिसांनी २४ तासांत ३४ वर्षीय आरोपीला बेड्या ठोकल्या

रायगडमध्ये मुंबईच्या १५ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. माणगावच्या घरोशीवाडी येथे डोंगर भागात निर्जन ठिकाणी या मुलीचा मृतदेह आढळून आला. डोक्यावर धारदार शस्त्राने वार करत आणि नंतर गळा आवळून तिची हत्या करण्यात आली. माणगाव पोलिस आणि फॉरेन्सिक टीमकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांनी अवघ्या २४ तासांत ३४ वर्षीय आरोपीला बेड्या ठोकल्या. या घटनेमुळे रायगड हादरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रायगडच्या माणगावमध्ये १५ वर्षीय मुलीचा मृतदेह जंगल परिसरात आढळून आला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलीचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला होता. मुलीच्या मृतदेहाची अवस्था पाहून तिची हत्या केल्याचे दिसून येत होते. तिच्या डोक्यावर धारदार शस्त्राचे वार होते आणि तिच्या गळ्यावर व्रण होते. शवविच्छेदन अहवालातून तिची हत्या करण्यात आल्याचे समोर आले होते. तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Raigad Crime: रायगड हादरले! मुंबईवरून गावी आलेल्या १५ वर्षीय मुलीची हत्या, धारदार शस्त्राने डोक्यावर वार नंतर गळा आवळला
Crime: महामार्गावर रक्तरंजित थरार! शेतीसाठी एकमेकांच्या जीवावर उठले, तरुणाकडून मावस भावावर कोयत्याने सपासप वार

निधी उतेकर असं हत्या झालेल्या मुलीचे नाव होते. तर शुभम उतेकर असे आरोपीचे नाव आहे. दोघेही मुंबईतल्या विलेपार्ले येथे राहत होते. ते माणगाव जिल्ह्यातील पळसगावचे रहिवासी होते. पोलिसांनी सांगितले की, नववीची परीक्षा उत्तीर्ण झालेली निधी काही दिवसांपूर्वी तिच्या आई-वडील आणि भावासोबत गावी आली होती.

Raigad Crime: रायगड हादरले! मुंबईवरून गावी आलेल्या १५ वर्षीय मुलीची हत्या, धारदार शस्त्राने डोक्यावर वार नंतर गळा आवळला
Crime: दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले, घरात घुसून मायलेकीची हत्या; नंतर आरोपीने उचललं टोकाचं पाऊल

विवाहित असलेला आरोपी शुभम देखील काही दिवसांपूर्वी गावी आला होता. सोमवारी संध्याकाळी निधी कुणाशी तरी फोनवर बोलताना तिच्या वडिलांना शेवटची दिसली होती. त्यानंतर ती गायब झाली होती. ती फोनवर शुभमशी बोलत असल्याचा संशय होता पण अशी माहिती समोर आली नाही. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता. त्यानंतर अवघ्या २४ तासांत पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी निधीच्या कुटुंबीयांनी केली.

Raigad Crime: रायगड हादरले! मुंबईवरून गावी आलेल्या १५ वर्षीय मुलीची हत्या, धारदार शस्त्राने डोक्यावर वार नंतर गळा आवळला
Pune Crime: पुण्यात जनगणान करायला आलेल्या महिला कर्मचाऱ्यासोबत भयंकर घडलं, १० ते १५ जणांकडून शिवीगाळ करत मारहाण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com