Telangana Politics: KCR महाराष्ट्रात, मात्र तेलंगणात BRS ला धक्का! 35 नेते काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत

KCR महाराष्ट्रात, मात्र तेलंगणात BRS ला धक्का! 35 नेते काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत
Telangana Politics : KCR And Rahul Gandhi
Telangana Politics : KCR And Rahul GandhiSaam TV
Published On: 

Telangana Political News : तेलंगणातील भारत राष्ट्र समितीला (BRS) विधानसभा निवडणुकीपूर्वी (Telangana Assembly Elections 2023) मोठा धक्का बसला आहे. माजी खासदार पी श्रीनिवास रेड्डी आणि तेलंगणा सरकारचे माजी मंत्री जुपल्ली कृष्ण राव यांच्यासह राज्यातील 35 नेते काँग्रेसमध्ये सामील होणार आहेत. या नेत्यांनी सोमवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेतली.

श्रीनिवास रेड्डी खम्मममधून लोकसभा सदस्य आहेत. तेलंगणाचे कृष्णा राव के. चंद्रशेखर राव हे सरकारमध्ये ग्रामविकास मंत्री राहिले आहेत. या दोन्ही नेत्यांना पक्षविरोधी कारवायांच्या आरोपावरून काही महिन्यांपूर्वी भारत राष्ट्र समितीतून निलंबित करण्यात आले होते.

Telangana Politics : KCR And Rahul Gandhi
YouTuber Devraj Patel: 'दिल से बुरा लगता है', कॉमेडियन देवराजचा रस्ते अपघातात मृत्यू

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी खासदार पी श्रीनिवास रेड्डी आणि माजी मंत्री जुपल्ली कृष्ण राव त्यांच्या समर्थकांसह जुलैच्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीत औपचारिकपणे काँग्रेस पक्षात प्रवेश करतील. दरम्यान, तेलंगणा विधानसभेत 119 जागा आहेत. राज्यात वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. (Latest Political News)

काँग्रेस मिशन तेलंगणा

काँग्रेस पक्षाने 100 मतदारसंघात एकूण 25 लाख लोकांची नोंदणी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 20 हजार ते 30 हजार समर्थकांची नोंदणी होणार आहे.

Telangana Politics : KCR And Rahul Gandhi
Monsoon Update: देशात 80 टक्के भागात पावसाला सुरुवात, यंदा नवीन पॅटर्नमध्ये मान्सून झाला दाखल; शास्त्रज्ञ म्हणाले...

यातच 2 जून रोजी राज्याचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. तेलंगण आंदोलनात काँग्रेसची सक्रिय भूमिका आणि सोनिया गांधी यांच्या योगदानाची लोकांना पुन्हा एकदा आठवण करून देण्यासाठी मोठ्या कार्यक्रमाकांचं आयोजन केलं जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.