Maharashtra Monsoon Update: देशातील लोक उष्णतेमुळे चांगलेच त्रस्त झाले होते. यातच गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यांमध्ये पावसाने हजेरी लावली, यामुळे लोकांना उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला. यंदाचा मान्सून (Monsoon in India) आतापर्यंत देशाच्या 80 टक्के भागात पोहोचला आहे.
भारतीय हवामान विभागाचे (IMD) वरिष्ठ शास्त्रज्ञ नरेश कुमार यांनी सांगितलं की, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सून देशाच्या विविध भागात वेगाने पोहोचत आहे. रविवारी दिल्ली आणि मुंबईत मान्सूनचे आगमन झाले. 62 वर्षांनंतर हा प्रकार घडल्याचे कुमार यांनी सांगितले.
कुमार यांनी सांगितले की, साधारणपणे 11 जूनपर्यंत मान्सून मुंबईत आणि 27 जूनपर्यंत दिल्लीत पोहोचतो. मात्र यावेळी मान्सून एकाच दिवशी दोन्ही मेट्रो शहरात पोहोचला. मात्र त्याचा थेट संबंध हवामान बदलाशी जोडता येणार नाही. कारण यासाठी 30 ते 40 वर्षांचा डेटा आवश्यक आहे. (Latest Political News)
नव्या पॅटर्नमध्ये मान्सून पोहोचला
भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (आयएमडी) वरिष्ठ शास्त्रज्ञ नरेश कुमार यांनी सांगितले की, यंदा मान्सून देशाच्या विविध भागात नवीन पॅटर्नमध्ये पोहोचला आहे. ते म्हणाले, "सर्वसाधारणपणे मान्सून कमी दाबाच्या क्षेत्रातून सक्रिय असतो. कमी दाबाच्या क्षेत्रात वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे मान्सून वेगाने देशाच्या विविध भागात पोहोचला. दोन दिवसांत अनेक भागात जोरदार पाऊस झाला."
या 25 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, झारखंड, हिमाचल, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेश, कोकण-गोवा, छत्तीसगड, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, दिल्ली, पूर्व राजस्थान, गुजरात, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, किनारी कर्नाटक आणि केरळमध्ये दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.