Devendra Fadnavis News: फडणवीस म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसला दाखवण्यापुरते ओबीसी लागतात. प्रमुख संविधानिक पदं आली की ओबीसींचा त्यांना विसर पडतो हेच आपण पाहत आलेलो आहे. हे मी म्हणतो असं नाहीये, तर त्यांच्याच पक्षातूनच ओबीसी अध्यक्ष करण्याची मागणी आली आहे.
खरं म्हणजे त्यांच्या पक्षातील नेते दबक्या आवाजात जे बोलतात, तेच मी बोललो. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, राष्ट्रवादी पक्ष कोणाच्या दबावात चालतो. हे मी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पवारांनी बेईमानी केलं असं नाही म्हणलो - पडणवीस
पवार साहेब 1978 साली वसंतदादा पाटील यांच्यासोबत मंत्री होते, तेव्हा त्यांनी पक्ष फोडला, त्यातील 40 लोक बाहेर काढले आणि भारतीय जनता पक्षासोबत सरकार स्थापन केलं. आता एकनाथ शिंदे हे आमच्यासोबत निवडून आले होते.
त्यांनी तेथून 50 लोक घेऊन आमच्यासोबत सरकार तयार केलं. मग पवार साहेबांनी तयार केलेलं सरकार ही मुत्सद्देगिरी आणि एकनाथ शिंदे यांनी तयार केलेलं सरकार ही बेईमानी कशी होऊ शकते, असे मी म्हटलो. मी कुठेही पवार साहेबांनी बेईमानी केली असं म्हटलं नाही. (Latest Political News)
माझ्या प्रश्नाचं उत्तर का कोणी देत नाही - फडणवीस
देवेंद्र फडणवीस म्हणाले, पवार साहेबांनी केली ती मुत्सद्देगिरी आणि एकनाथ शिंदे यांनी केलेली कद्दारी कशी याचं उत्तर का कोणी देत नाही. उलट शिंदे यांची केस मेरिटची केस आहे. कारण ते आमच्यासोबत निवडून आले होते. (Marathi Tajya Batmya)
पवार साहेब तर काँग्रेससोबत निवडून आले आणि नंतर आमच्यासोबत आले होते. त्यामुळे मी कधी जन्माला आलो होतो, आलो होतो की नव्हतो याने इतिहास बदलत नाही. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.