Devendra Fadnavis News: देशात महात्मा गांधींचाच विचार चालेल, गोडसेचा चालणार नाही - देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis Statement : या देशात महात्मा गांधींचाच विचार चालेल, गोडसेचा चालणार नाही असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
Devendra Fadnavis about Gandhi and Godse
Devendra Fadnavis about Gandhi and Godsesaam tv
Published On

Devendra Fadnavis about Godse : या देशात गोडसेचं उदात्तीकरण करणं योग्य नाही. या देशात महात्मा गांधींचाच विचार चालेल, गोडसेचा चालणार नाही असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

एसटी बँकेच्या निवडणुकीत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलचा विजय झाला. या विजयाच्या जल्लोषात गोडसेचे पोस्टर देखील दाखवण्यात आले. यावर बोलताना देताना देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadnavis about Gandhi and Godse
Maharashtra Monsoon Update: राज्यात उद्या पावसाचा जोर वाढणार, या ठिकाणी पडणार अतिमुसळधार पाऊस; हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी

"मी पवार साहेबांनी बेईमानी केली असं म्हटलं नाही"

पवारसाहेब 1978 साली वसंतदादा पाटील यांच्यासोबत मंत्री होते, तेव्हा त्यांनी पक्ष फोडला, त्यातील 40 लोक बाहेर काढले आणि भारतीय जनता पक्षासोबत सरकार स्थापन केलं. आता एकनाथ शिंदे हे आमच्यासोबत निवडून आले होते. त्यांनी तेथून 50 लोक घेऊन आमच्यासोबत सरकार तयार केलं. मग पवार साहेबांनी तयार केलेलं सरकार ही मुत्सद्देगिरी आणि एकनाथ शिंदे यांनी तयार केलेलं सरकार ही बेईमानी कशी होऊ शकते, असे मी म्हटलो. मी कुठेही पवार साहेबांनी बेईमानी केली असं म्हटलं नाही. (Marathi Tajya Batmya)

"पवारांची मुत्सद्देगिरी, मग शिंदेची बेईमानी कशी?"

देवेंद्र फडणवीस म्हणाले, पवार साहेबांनी केली ती मुत्सद्देगिरी आणि एकनाथ शिंदे यांनी केलेली कद्दारी कशी याचं उत्तर का कोणी देत नाही. उलट शिंदे यांची केस मेरिटची केस आहे. कारण ते आमच्यासोबत निवडून आले होते. पवार साहेब तर काँग्रेससोबत निवडून आले आणि नंतर आमच्यासोबत आले होते. त्यामुळे मी कधी जन्माला आलो होतो, आलो होतो की नव्हतो याने इतिहास बदलत नाही. (Latest Political News)

Devendra Fadnavis about Gandhi and Godse
Thackeray Group Beat BMC Officer: शाखेवर हातोडा अधिकाऱ्याला चोप! बाळासाहेबांचा फोटो न काढू दिल्याने कार्यकर्त्ये संतापले

"राष्ट्रवादी काँग्रेसला दाखवण्यापुरते ओबीसी लागतात"

फडणवीस म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसला दाखवण्यापुरते ओबीसी लागतात. प्रमुख संविधानिक पदं आली की ओबीसींचा त्यांना विसर पडतो हेच आपण पाहत आलेलो आहे. हे मी म्हणतो असं नाहीये, तर त्यांच्याच पक्षातूनच ओबीसी अध्यक्ष करण्याची मागणी आली आहे. खरं म्हणजे त्यांच्या पक्षातील नेते दबक्या आवाजात जे बोलतात, तेच मी बोललो. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, राष्ट्रवादी पक्ष कोणाच्या दबावात चालतो. हे मी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com