Maharashtra Monsoon Update: राज्यात उद्या पावसाचा जोर वाढणार, या ठिकाणी पडणार अतिमुसळधार पाऊस; हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी

Meteorological Department Alert: पुढील 24 तासांत राज्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिक जिल्ह्यात अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Monsoon in Maharashtra
Monsoon in MaharashtraSaam TV
Published On

Mumbai Rain: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सून (Monsoon 2023) चांगलाच सक्रीय झाला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) पडत आहे. अशामध्ये पावसाबाबत हवामान खात्याकडून (Weather Department) महत्वाची अपडेट समोर आली आहे. उद्या राज्यातील अनेक परिसरामध्ये पावसाचा जोर वाढणार असून अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसंच हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देखील जारी करण्यात आला आहे.

Monsoon in Maharashtra
Devendra Fadnavis News: देशात महात्मा गांधींचाच विचार चालेल, गोडसेचा चालणार नाही - देवेंद्र फडणवीस

हवामान खात्याकडून (meteorological department) दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 तासांत राज्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिक जिल्ह्यात अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. 27 जून मंगळवारी राज्यात हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यात देखील सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. अशामध्ये नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. तसंच, नाशिक, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Monsoon in Maharashtra
Thackeray Group Beat BMC Officer: शाखेवर हातोडा अधिकाऱ्याला चोप! बाळासाहेबांचा फोटो न काढू दिल्याने कार्यकर्त्ये संतापले

कोकणामध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अशामध्ये कोकणात पुढचे दोन दिवस देखील मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसंच, किनारपट्टी भागात देखील पुढचे दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Monsoon in Maharashtra
Prakash Ambedkar News: छत्रपती संभाजीराजेंना मनुस्मृतीप्रमाणे शिक्षा, प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याने खळबळ

यावर्षी मान्सूनचे आगमन उशिरा झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आला होता. पण आता मान्सूनने रोज धरला आहे. अशामध्ये पेरण्या कधी करायचा असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडला आहे. राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की,'यंदा 21 जूनपर्यंत पावसाचे प्रमाण कमी होते पण आता पावसाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत सरासरीच्या 25 टक्के पाऊस झाल्यामुळे राज्यात आतापर्यंत 2 लाख 47 हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. पण जोपर्यंत जमीन पुर्णतः ओली होत नाही तोपर्यंत पेरणी करु नका, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com