>> तुषार ओव्हाळ
Thackeray Group Beat BMC Officer: वांद्रे येथील ठाकरे गटाची शाखा ही अनधिकृत असल्याचा ठपका ठेवून पालिकेने शाखा तोडत कारवाई केली. या कारवाईमुळे शिवसैनिक (ठाकरे गट) आता आक्रमक झाल्याचं दिसत आहे.
शाखेवरील कारवाई दरम्यान बाळासाहेबांचा फोटो न काढू दिल्याने ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बीएमसी अधिकाऱ्याला चोप दिला आहे. यानिमित्त पुन्हा एकदा शिवसेनेची ही राडा संस्कृती दिसली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पालिका अधिकाऱ्याने ठाकरे गटाच्या शाखेवर कारवाई केली होती. पण या कारवाईने ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना तितका राग नाही आला. जिततका त्यांचे आराध्य दैवत बाळासाहेबांचा अपमान केल्याचा आला. बाळासाहेबांचा अपमान केल्याचा आरोप करत शिवसैनिकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि पालिका अधिकाऱ्यालाच चोप देण्यात आला. (Latest Marathi News)
आधी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पालिकेच्या ऑफिसात घेराव घातला. मग पालिका अधिकाऱ्याची कार्यालयात आले. पोलिसही तिथेच होते. पालिका अधिकारी बोलत असताना मागून एक हात थेट त्यांच्या गालावर पडतो आणि मग बाचबाची सुरु झाली. पोलिस या अधिकाऱ्याला वाचवण्याची धडपड करत होते. (Latest Political News)
वांद्रे येथे ठाकरे याचं निवासस्थान मातोश्री आहे. या वांद्रेमध्ये ठाकरे गटाची एक शाखा होती. ही शाखा अनधिकृत आहे, असं पालिका अधिकाऱ्यांनी सांगितलं आणि त्याच्यावर 22 जूनला तोडक कारवाई केली.
ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना तोडक कारवाई करण्यास विरोध नाही केला. पण शाखेत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो होता. हा फोटो तरी काढू द्या, अशी विनंती या शिवसैनिकांनी केली. पण पालिका कर्मचारी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. पालिका अधिकाऱ्यांनी बाळासाहेबांचा फोटो असलेली शाखाच तोडून टाकली. त्यामुळे ठाकरे गटाचे शिवसैनिक चांगलेच चिडले.
ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी H East पालिकेच्या कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चादरम्यान ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी कार्यालयात गाठलं. ज्या अधिकाऱ्याने ही कारवाई केली, त्याला पाहून शिवसैनिक खवळले आणि या अधिकाऱ्याला शिवसैनिकांना मारहाण केली. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केली आणि या अधिकाऱ्याला शिवसैनिकांच्या तावडीतून सोडवले. पालिका अधिकाऱ्याला मारहाण केली. पण याबाबत पोलिसांकडे कुठलीही तक्रार दाखल झालेली नाहीये.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.