तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात टँकरने ऑटोला धडक दिल्याने पाच जणांचा मृत्यू
या अपघातात सात जण गंभीर जखमी
ऑटोमध्ये ११ महिला आणि चालकासह एकूण १२ जण प्रवास करत होते
पोलिसांचा तपास सुरु आहे
तेलंगणामधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. संगारेड्डी जिल्ह्यात मंगळवारी रात्री भीषण अपघात झाला. सत्वरजवळ टँकर ट्रकने ऑटोरिक्षाला जोरदार धडक दिल्याने पाच जणांचा मृत्यू झाला, तर सात जण गंभीर जखमी झाले. अपघाताची तीव्रता इतकी होती की ऑटोरिक्षाचे मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून स्थानिक पोलीस घटनेचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ऑटोरिक्षातून कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील शेतमजूर जहीराबादच्या दिशेने जात होते. या ऑटोमध्ये एकूण १२ जण होते. त्यापैकी बहुतांश महिला होत्या. पोलिसांच्या माहितीनुसार, ११ महिला आणि ऑटोचालक प्रवास करत होते. मृतांमध्ये रेखा, श्रीदेवी, कविता, रेश्मा आणि ऑटोचालक देवदास यांचा समावेश आहे. उदरनिर्वाहासाठी कामाच्या शोधात या महिला जहीराबादला जात असल्याची माहिती आहे.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमींना जवळच्या विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अपघाताच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू आहे. दरम्यान, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी घडलेल्या या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. जखमींना रुग्णालयात योग्य ते उपचार मिळावेत आणि उपचारात कोणतीही हलगर्जीपणा होऊ नये, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
याच रात्री कोहिर मंडलातील कावेली येथे एनएच-६५ वर आणखी एक अपघात झाला. कार दुभाजकाला धडकून समोरून येणाऱ्या वाहनांवर आदळली. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले. किमान चार वाहनांचे नुकसान झाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.