Alisha Khedekar
नवीन कपडे पहिल्यांदा नेहमी थंड पाण्यात धुवा, त्यामुळे रंग फिका होण्याची शक्यता कमी होते.
पहिल्यांदा नवीन कपडे धुलाताना पाण्यात थोडे मीठ घाला. कपड्यांचा रंग टिकवण्यासाठी हा सोपा घरगुती उपाय मानला जातो.
पाण्यात थोडे पांढरे व्हिनेगर मिसळून कपडे काही मिनिटे भिजवा, नंतर स्वच्छ पाण्याने धुवा.
कपडे धुण्यापूर्वी आतली बाजू बाहेर करा. यामुळे रंगावर थेट घर्षण कमी होऊन कपडे अधिक काळ चांगले दिसतात.
कपडे स्वच्छ करण्यासाठी भरपूर डिटर्जंटची गरज नसते. जास्त डिटर्जंटमुळे रंग लवकर फिका होऊ शकतो.
रंगीत कपडे थेट कडक उन्हात वाळवण्याऐवजी सावलीत वाळवा, त्यामुळे रंगाची चमक जास्त काळ टिकते.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा