IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Tamilnadu IAS Transfer News : तमिळनाडू सरकारने मोठा प्रशासकीय फेरबदल करत २७ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. महसूल, शालेय शिक्षण, ग्रामीण विकास, वस्त्रोद्योग आणि जिल्हास्तरावरील महत्त्वाच्या पदांवर नव्या नियुक्त्या करण्यात आल्या.
Tamilnadu ias officer transfer
Tamilnadu ias officer transferAI Image
Published On
Summary
  • तमिळनाडू सरकारने मोठा प्रशासकीय फेरबदल केला

  • राज्यातील २७ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

  • अनेक महत्त्वाच्या विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या बदलल्या

तमिळनाडू सरकारने मंगळवारी मोठा प्रशासकीय फेरबदल करत तब्बल २७ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. या फेरबदलात महसूल प्रशासन, शालेय शिक्षण, ग्रामीण विकास, वस्त्रोद्योग, पर्यटन, नागरी वाहतूक आणि विविध महत्त्वाच्या विभागांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महसूल प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव तसेच आयुक्त एन. मुरुगानंदम यांची बदली केली. त्यांना तमिळनाडू स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन (TANSI)च्या अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या जागी शालेय शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बी. चंद्रमोहन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तमिळनाडू हँडलूम विव्हर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या (Co-optex) व्यवस्थापकीय संचालक जे. इनोसंट दिव्या यांच्याकडे आता शालेय शिक्षण सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Tamilnadu ias officer transfer
Veg Bombil Recipe : कुरकुरीत आणि झणझणीत व्हेज बोंबील, फक्त पाच मिनिटात होईल तयार; वाचा रेसिपी

तर दुसरीकडे TANSIचे अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक धर्मेंद्र प्रताप यादव यांची ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली असून, ते प्रशांत एम. वाडनेरे यांची जागा घेतील. स्टेशनरी अँड प्रिंटिंग विभागाच्या आयुक्त आर. लिली यांची हँडलूम्स, हँडीक्राफ्ट्स, टेक्सटाइल्स अँड खादी विभागाच्या सचिवपदी बदली करण्यात आली आहे. तर टी.एन. वेंकटेश यांची TUFIDCOच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. TUFIDCOच्या व्यवस्थापकीय संचालक कविता रामू यांच्याकडे तमिळनाडू स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Tamilnadu ias officer transfer
Lotus : कमळाला राष्ट्रीय फुलाचं स्थान, जाणून घ्या या मागचं कारण

दुग्ध उत्पादन आणि डेअरी विकास आयुक्त अजित यादव यांची नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण आयुक्तपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी एस. सिवारासू यांची नियुक्ती करण्यात आली असून, ते तमिळनाडू को-ऑपरेटिव्ह मिल्क प्रोड्यूसर्स फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक म्हणूनही काम पाहतील. दरम्यान, D. मोहन यांची गृह, प्रतिबंध आणि उत्पादन शुल्क विभागाच्या अतिरिक्त सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते जे. अ‍ॅन मेरी स्वर्णा यांची जागा घेतील. स्वर्णा यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.

Tamilnadu ias officer transfer
Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

जिल्हास्तरावर महत्त्वाचा बदल

तसेच जिल्हास्तरावरही महत्त्वाच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पेरंबलूरच्या जिल्हाधिकारी शरण्या अरी यांची विरुधुनगर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. तसेच व्ही. नल्लासिवन यांची तिरुपत्तूर जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. या फेरबदलामुळे राज्यातील अनेक महत्त्वाच्या प्रशासकीय विभागांच्या कामकाजात नव्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून बदल होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com