Alisha Khedekar
व्हेज बोंबील तयार करण्यासाठी अळूच्या भाजीचे देठ, तेल, अदरक लसूणची पेस्ट, लिंबाचा रस, हळद, मसाला, मीठ, रवा वापरा.
अळूच्या देठांचे मध्यभागी दोन भाग करा आणि ते उकळत्या पाण्यात मीठ टाकून त्यात सोडा. काही वेळ ते शिजवून घ्या. तसेच अळूला खाज असल्याने उकळत्या पाण्यात कोकमाचे आगळ टाका.
सारण तयार करताना कांदा, टोमॅटो,आलं लसूणची पेस्ट तयार करून त्यामध्ये लिंबाचा रस घाला. तसेच घरगुती मसाले टाकून चवीनुसार मीठ टाका.
शिजलेले अळूचे देठ पाण्याच्या बाहेर काढून त्यामध्ये तयार केलेल सारण भरा आणि योग्यपद्धतीने भरून घ्या.
बोंबिलमध्ये सारण भरून तळण्यासाठी त्याला बाहेरून तांदळाचे पीठ, रवा आणि कुरकुरीत होण्यासाठी कॉर्नफ्लॉवर पीठ वापरू शकता.
अळूच्या देठांमध्ये सारण भरून बाहेरून पीठ लावून त्याला तळा. श्रावण असू दे, मार्गशीष असू दे किंवा एखादा व्हेज खाणारा व्यक्ती त्याच्यासाठी हा पदार्थ उत्तम पर्याय आहे.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा