भाजपच्या मित्रपक्षात मोठी फूट; ३६ आमदारांनी माजी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पुकारले बंड, राजकारणात खळबळ

AIADMK 36 MLAs Rebellion Latest News: तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक पक्षात मोठी फूट पडली असून 36 आमदारांनी ईपीएस यांच्या विरोधात बंड पुकारलं आहे. राज्यातील सत्तासमीकरण बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Rebel AIADMK MLAs gather amid escalating political crisis in Tamil Nadu, challenging EPS leadership.
Rebel AIADMK MLAs gather amid escalating political crisis in Tamil Nadu, challenging EPS leadership.saam tv
Published On

तमिळनाडूच्या राजकारणात आणि विशेषतः अण्णा द्रमुक पक्षात रविवारी पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. माजी मंत्री सी. व्ही. षनमुगम यांनी पक्षाचे सरचिटणीस एडप्पाडी के. पलानीस्वामी यांच्याविरोधात 36 नवनिर्वाचित आमदारांना एकत्र करत बंड करण्याचा इशारा दिला आहे. निवडणुकीतील पराभवानंतर उफाळलेल्या या राजकारणामुळे पक्षात दोन गट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पक्षातील एका गटाने पलानीस्वामींवर मनमानी कारभार करण्याचा आणि पक्षाच्या हितापेक्षा स्वतःचा स्वार्थ सादत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. अण्णा द्रमूकने भाजप, एनडीए ( NDA) आघाडीसोबत निवडणूक लढवली होती. ज्यामध्ये पक्षाला 47 जागा मिळाल्या आहेत. तर युतीने एकूण 53 जागांवर विजय मिळवला आहे.

Rebel AIADMK MLAs gather amid escalating political crisis in Tamil Nadu, challenging EPS leadership.
Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेल 415 रुपयांपार, पाकिस्तानी जनतेची झोप उडाली

बंडखोर नेत्यांची पुढील रणनीती

सी.व्ही. षणमुगम यांच्या नेतृत्वाखाली हा गट सोमवारी पत्रकार परिषदेद्वारे आपली पुढची भूमिका स्पष्ट करणार आहे. षणमुगम गटाच्या एका नेत्यानं उघडपणे म्हटलं आहे की, ईपीएस हे पक्षाच्या कल्याणासाठी नाही, तर केवळ स्वतःच्या फायद्यासाठी निर्णय घेत आहेत. तमिळनाडूमध्ये सध्या त्रिशंकू परिस्थिति निर्माण झाली असून विविध पक्षांकडून सत्तास्थापनेसाठी प्रयत्न सुरू आहेत. षणमुगम गट यांनी अभिनेता तथा मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या TVK पक्षासोबत युती करण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. तर दुसरीकडे पलानीस्वामी हे छुप्या पद्धतीने सत्ताधारी डीएमकेचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.

Rebel AIADMK MLAs gather amid escalating political crisis in Tamil Nadu, challenging EPS leadership.
लोकभवनात हायव्होल्टेज ड्रामा! राज्यपालांनी भर शपथविधीत थलापती विजय यांना रोखलं; नेमकं कारण काय?

रिसॉर्ट पॉलिटिक्स अन् बैठकांचे सत्र...

पुडुचेरी येथील एका रिसॉर्टमधून परतल्यानंतर आमदारांनी पलानीस्वामींसोबत बैठक घेतली. त्यानंतर ईपीएस यांनी एक्सवर ट्विट करत सरकार स्थापन करणाऱ्या पक्षाचे अभिनंदन करणारी एक सूचक पोस्ट केली. यामुळे त्यांचे DMK सोबतचे प्रयत्न अपयशी ठरल्याचे बोलले जात आहे. यानंतर लगेचच षणमुगम यांच्या निवासस्थानी 35 आमदारांची बैठक झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, हे बंडखोर आमदार विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावेळी विजय यांच्या पक्षाला पाठिंबा देऊन आपणच खरे अण्णा द्रमुक असल्याचा दावा करण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

Rebel AIADMK MLAs gather amid escalating political crisis in Tamil Nadu, challenging EPS leadership.
Coronavirus : कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडला, वटवाघळात ‘क्लेड बी’ विषाणूचा शोध

मतदारांशी विश्वासघात केल्याचा आरोप

सी.व्ही. षणमुगम यांनी पलानीस्वामी मतदारांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. पक्ष निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेल्यानंतरही ईपीएस यांनी उदयनिधी स्टॅलिन यांच्या माध्यमातून सत्तेसाठी प्रयत्न केल्याने कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. सध्या अण्णा द्रमुकमधील वरिष्ठ नेते दोन्ही गटात समन्वय घडवून आणण्यात अपयशी ठरले असून तमिळनाडूच्या राजकारणाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com