सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला मिळाली 35 कोटींची ऑफर; सरकार पाडण्याचा होता कट? राजकीय वर्तुळात खळबळ

Tamil Nadu MLA Offered 35 Crore For Voting Against Speaker: तमिळनाडूमध्ये आमदाराला ३५ कोटींची ऑफर देऊन सरकार पाडण्याचा कट उघडकीस. तीन जण अटकेत असून माजी मंत्र्यांपर्यंत तपास पोहोचण्याची शक्यता.
Tamil Nadu political controversy erupts after MLA alleges ₹35 crore bribe offer to vote against the Speaker.
Tamil Nadu political controversy erupts after MLA alleges ₹35 crore bribe offer to vote against the Speaker.saam tv
Published On

तमिळनाडूमध्ये गेल्या काही दिवसांपासून थलपती विजय यांचे सरकार पडणार असल्याच्या बातम्या समोर येत असतानाच आज पोलिसांनी मोठी कारवाई करत सरकार पाडण्याचा कट रचणाऱ्या तीन जणांना अटक केली आहे. ही कारवाई TVK चे आमदार एन. इलैयाराजा यांनी केलेल्या आरोपानंतर करण्यात आली. त्यांनी दावा केला होता की, विधानसभा अध्यक्षांविरोधात आणल्या जाणाऱ्या प्रस्तावाच्या बाजूने मतदान करण्यासाठी त्यांना तब्बल 35 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती.

Tamil Nadu political controversy erupts after MLA alleges ₹35 crore bribe offer to vote against the Speaker.
Delhi Fire : हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी गेले अन् काळानं झडप घातली; चार्टर्ड अकाउंटंट विवेकसह कुटुंबातील ८ जणांचा होरपळून मृत्यू

या प्रकरणात आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली असून तपासाचा धागा माजी मंत्री सेंथिल बालाजी आणि त्यांचे भाऊ अशोक कुमार यांच्यापर्यंतही पोहोचण्याची शक्यता आहे. तमिळनाडूचे मंत्री पी.निर्मल कुमार यांनी दावा केला की, डीएमके पक्ष गेल्या 40 दिवसांपासून सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत होता. हे प्रकरण तेव्हा उघडकीस आले, जेव्हा उथंगराई मतदारसंघातील TVK चे आमदार एन. इलैयाराजा यांनी चेन्नई पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांनी आरोप केला की, IPDS कन्सल्टन्सी फर्मशी संबंधित एका व्यक्तीने त्यांना विधानसभा अध्यक्ष आणि TVK नेते JCD प्रभाकर यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मतदान करण्यासाठी ३५ कोटी रुपयांची ऑफर दिली.

Tamil Nadu political controversy erupts after MLA alleges ₹35 crore bribe offer to vote against the Speaker.
पोलिसांसमोरच राजकीय नेत्याची चाकूने भोसकून हत्या; राजकारणात मोठी खळबळ

तसेच त्यांनी असाही आरोप केला की, ऑफर नाकारल्यानंतर त्यांना धमक्या देण्यात आल्या आणि याबाबत कुणाशीही बोलू नये, असा इशारा दिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तपासात माजी डीएमके मंत्री वी. सेंथिल बालाजी आणि त्यांचे भाऊ वी. अशोक कुमार यांची नावेही समोर आली आहेत. २९ जून रोजी चेन्नई पोलिस आयुक्तांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, थिरुनावुक्कारासू नावाच्या व्यक्तीने इलैयाराजा यांच्याशी संपर्क साधला होता. त्याने स्वतःला ‘इंडियन पॉलिटिकल डेमोक्रेटिक स्ट्रॅटेजीज’ (IPDS) या ओपिनियन पोलिंग संस्थेचा प्रमुख असल्याचे सांगितले आणि एका मोठ्या राजकीय पक्षाच्या वतीने बोलत असल्याचा दावा केला.

Tamil Nadu political controversy erupts after MLA alleges ₹35 crore bribe offer to vote against the Speaker.
Pune Accident: पुणे- नाशिक महामार्गावर ३ वाहनांचा विचित्र अपघात, आयटी इंजिनिअरचा मृत्यू; ७ जण गंभीर

नेमकं काय होतं कटकारस्थान?

संबंधित व्यक्तीने आमदारांना सांगितले की, तमिळनाडू विधानसभा अध्यक्षांविरोधात प्रस्ताव आणला जाणार असून, सत्ताधारी पक्षाचे सदस्य असूनही त्यांनी त्या प्रस्तावाच्या बाजूने मतदान करावे. त्याबदल्यात त्यांना ३५ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली. इलैयाराजा यांनी ही ऑफर नाकारल्याचे सांगितले आणि पुन्हा संपर्क साधू नये असेही स्पष्ट केले. मात्र, त्यानंतर त्यांना धमकावण्यात आले आणि या बाबत बोलल्यास त्यांना व त्यांच्या कुटुंबाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा देण्यात आल्याचा आरोप आहे.

दरम्यान, तमिळनाडू पोलिसांच्या गुप्तचर विभागालाही या कटाची माहिती मिळाली होती. TVK च्या किमान १५ आमदारांना खरेदी करून सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस तपासात असेही उघड झाले की, डीएमकेचे माजी मंत्री सेंथिल बालाजी यांचे भाऊ अशोक कुमार यांनी चेन्नईत नरेश नावाच्या व्यक्तीशी भेट घेतली होती. तसेच, थिरुनावुक्कारासूने सेंथिल बालाजी आणि अशोक कुमार यांच्या सांगण्यावरूनच इलैयाराजा यांच्याशी संपर्क साधल्याचा आरोप तपास यंत्रणांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com