14.22 लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ; मुख्यमंत्री होताच घेतला गेमचेंजर निर्णय

tamilnadu farmer : तामिळनाडूतील 14.22 लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री विजय यांनी घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर शेतकऱ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.
tamilnadu news
tamilnadu farmer news Saam tv
Published On
Summary

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय

अल्पभूधारक शेतकऱ्यांचं कर्ज केलं माफ

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाने होणार १४.२२ लाख शेतकऱ्यांना फायदा

तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांनी सहकारी बँकेतून ५० हजारांपर्यंत घेतलेलं पी कर्ज माफ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. तर या निर्णयामुळे मोठ्या शेतकऱ्यांचं ५००० हजारापर्यंत कर्ज माफ होईल. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे राज्यातील १४.२२ लाख शेतकऱ्यांना थेट लाभ होणार आहे. या घोषणेमुळे तामिळनाडू सरकारला २,०४४ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

तामिळनाडू सरकारकडून रक्कम थेट सहकारी बँकांना ट्रान्सफर केली जाणार आहे. या निर्णयाने अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज राहणार नाही. विजय सरकारच्या निर्णयाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच खराब हवामानामुळे शेतीचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा खर्च भरून निघणार आहे.

tamilnadu news
Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर शेतकऱ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. शेतकरी नेते देखील या निर्णयाचे स्वागत करत आहेत. तामिळनाडू सरकार या संदर्भात लवकरच गाइडलाइन्स जारी करणार आहे. राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांनाही पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्री विजय यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत कावेरी नदीवर कर्नाटक सरकारकडून बांधण्यात येणाऱ्या मेकेदातू धरण प्रकल्पावर चर्चा झाली . तामिळनाडूत या धरण प्रकल्पाचा विरोध केला जात आहे. नव्या धरण प्रकल्पामुळे तामिळनाडूच्या वाट्याला कमी पाणी येईल, असा दावा केला जात आहे. तसेच यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होईल, असाही दावा तामिळनाडूतील आंदोलकांकडून केला जात आहे.

tamilnadu news
महाराष्ट्रावर मोठं संकट येतंय! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना केलं अलर्ट

कर्नाटकमधील या प्रकल्पाचं भूमिपूजन सोहळा झाल्यानंतर तामिळनाडूत बैठक बोलावण्यात आली होती. तामिळनाडूच्या जलहक्काचे संरक्षण करणे आणि शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणे , या मुद्द्यावर बैठकीत चर्चा झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com