Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

Maharashtra Farmer Loan Waiver: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनुसार येत्या ३० जूनपूर्वी सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्ण करण्यात येणार आहे. सरकारने कर्जमाफीची घोषणा केली होती, मात्र अंमलबजावणीची निश्चित तारीख जाहीर झाली नव्हती.
Maharashtra  Farmer Loan Waiver
Maharashtra FarmerSaam tv
Published On

राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची योजना जाहीर केली आहे. पण ती नेमकी कधी होणार याची नेमकी माहिती मात्र समोर आली नव्हती. त्यावरून शेतकरी आणि बँकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झालेली होती. आजच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तारीख सांगितली आहे. येत्या 30 जूनपूर्वी सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

त्यामुळे पुढच्या हंगामासाठी या शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा असेल, असं त्यांनी सांगितलं. तसेच राष्ट्रीयकृत बँकांनी त्यांचे कृषी संदर्भातील 80 टक्के कर्जवितरणाचे टार्गेट पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिलेत.

सरकारनं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महाविस्तार अॅप सुरू केले आहे. त्याआधारे शेतकऱ्यांना पीक पद्धती आणि इतर माहिती एआयच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. शेतकरी आपले प्रश्न त्याला विचारु शकतो. त्यावर आवश्यक ती माहिती या अॅपच्या माध्यमातून दिली जाणार आहे. शेतकरी कर्जमाफीबाबत कृषीमंत्री दत्ता भरणे माहिती दिली होती.

Maharashtra  Farmer Loan Waiver
महाराष्ट्रावर मोठं संकट येतंय! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना केलं अलर्ट

सरकारकडून ३० जूनपर्यंत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल, असं सांगितलं. शेतकरी कर्जमाफीसाठी कोणतीही अडचण येणार नाही. थकबाकीदार शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. यासह नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार असल्याचं कृषीमंत्री म्हणालेत.

Maharashtra  Farmer Loan Waiver
महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलसाठी रांगाच रांगा; राज्यातील 2 हजार पेट्रोल पंप कोरडे?

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू होणाऱ्या आचारसंहितेमुळे कर्जमाफीची प्रक्रिया लांबणार का, असा प्रश्न अनेकांना पडला होता. परंतु सरकारने आता त्यासदंर्भातील संभ्रम दूर केला आहे. शेतकरी कर्जमाफी ३० जून आधीच मिळणार असल्याची शाश्वती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com