महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलसाठी रांगाच रांगा; राज्यातील 2 हजार पेट्रोल पंप कोरडे?

Maharashtra Faces Fuel Crisis : राज्यात पेट्रोल-डिझेलच्या टंचाईमुळे पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तर काही ठिकाणी नो स्टॉकचे बोर्ड लागले आहेत. सरकार मात्र पुरेसा साठा असल्याचा दावा करत आहे. मग एवढया रांगा का लागल्या आहेत? शेतकरी का बेजार झालाय? इंधन पुरवठ्याबाबत नेमकं काय चुकलं आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
Maharashtra Faces Fuel Crisis
MAHARASHTRA FUEL CRISIS: LONG QUEUES AT PETROL PUMPS, 2,000 OUT OF STOCK?saam tv
Published On

राज्यातल्या पेट्रोल पंपांवर सध्या अभूतपूर्व अशी आणीबाणी पाहायला मिळतेय.एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत असतानाच दुसरीकडे राज्यातील 2 हजार पेट्रोल पंप पूर्णपणे कोरडे ठाक पडलेत. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा ते थेट गडचिरोलीपर्यंत डिझेल आणि पेट्रोल टंचाईमुळे हाहाकार उडालाय. महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमधल्या पेट्रोल पंपांची सध्य़ा काय स्थिती आहे? पाहूयात.

Maharashtra Faces Fuel Crisis
Maharashtra Fuel Crisis: 24 तासात शेतकऱ्यांसाठी 25 टक्के पेट्रोल पंप राखीव करा; अन्यथा..., राष्ट्रवादी काँग्रेसचा सरकारला इशारा

अहिल्यानगरमध्ये 400 पेट्रोल पंप असून 200 पेट्रोल पंप बंद झालेत. तर जळगावमध्ये 371 पेट्रोल पंपमधील 150 पेट्रोल पंप बंद झालेत.. नाशिकमध्ये 725 पैकी 75 पंप बंद ठेवण्यात आलेत. तर छत्रपती संभाजीनगरमधील 335 पैकी 55 पेट्रोल पंप बंद आहेत. सरकार पुरेसा साठा असल्याचं सांगत असले तरी राज्यात बहुतांश भागात इंधन टंचाईचा सर्वाधिक फटका बसतोय तो बळीराजाला. नाशिकच्या येवला तालुक्यात डिझेलचा पुरवठा विस्कळीत झाल्यानं शेतकरी प्लास्टिकचे कॅन घेऊन उन्हात उभे आहेत.

Maharashtra Faces Fuel Crisis
Petrol-Diesel Rate Rise: आठवडाभरात पेट्रोल-डिझेलची दुसऱ्यांदा दरवाढ; शेतकरी आणि सामान्यांच्या संतापाचा उद्रेक

मात्र, एका शेतकऱ्याला केवळ 5 लिटर डिझेल दिलं जात असल्याने शेतकरी संतप्त झालेत. अनेक तरुणांनी कर्ज काढून ट्रॅक्टर घेतले, पण डिझेलअभावी त्यांचे व्यवसाय ठप्प झालेत. तर नांदेडच्या हदगाव आणि हिमायतनगरमध्येही हीच भीषण परिस्थिती आहे, तर परभणीमध्ये शेतकरी आणि वाहनधारक चक्क पहाटे 4 वाजल्यापासून डिझेलसाठी रांगेत उभे राहत आहेत. त्याशिवाय गडचिरोलीत तर बहुतांश पंपांवर "नो स्टॉक"चे बोर्ड पाहायला मिळत आहेत.ज्यामुळ नागरिकांच्या संतापाचा भडका उडालाय.

जागतिक पातळीवरील परिस्थिती अशीच राहिली तर आगामी काळात आणखी विदारक स्थितीचा सामना करावा लागू शकतो. कारण इंधन कंपन्यांचे नुकसान कमी करण्यासाठी इंधनाचे दर टप्प्या टप्प्यानं आणखी वाढवले जाण्याची शक्यता आहे. मात्र चढ्या दरानं खरेदी करण्याची तयारी असली तरी पुरेसं पेट्रोल आणि डिझेल मिळेल की नाही याबाबत शाश्वती नाही. त्यामुळे योग्य पद्धतीनं नियोजन करून जनतेला विश्वासात घेऊन यावर उपाय योजण्याची गरज आहे अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com