Swami Chaitanyananda Saraswati : आय लव्ह यू, बेबी.... आश्रमातल्या बाबाचे एकापेक्षा एक कारनामे, Whatsapp चॅट उघड

Swami Chaitanyananda Saraswati news : आश्रमातल्या बाबाचे एकेक कारनामे उघड होऊ लागले आहेत. दिवसेंदिवस या बाबाच्या अडचणीत वाढ होत आहे.
Swami Chaitanyananda Saraswati update
Swami Chaitanyananda Saraswati Saam tv
Published On

आध्यात्मिक गुरु स्वामी चैतन्यानंद सरस्वतीच्या लाजीरवाण्या कृत्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांत तक्रार नोंद झाल्यानंतर चैतन्यानंद सरस्वतीचे एकेक कारनामे उघड होऊ लागले आहेत. शिक्षण संस्थेत EWS कोट्यातून प्रवेश मिळवून द्यायचं आश्वासन अनेक विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचा चैतन्यानंदवर आरोप आहे. स्वामी चैतन्यांनद हा दिल्लीतील खासगी शिक्षण संस्थेतील विद्यार्थिनींना अश्लील मेसेज पाठवायचा.

पोलिसांत गुन्हा झाल्यानंतर स्वामी चैतन्यानंद सरस्वती हा ६२ वर्षांचा फरार असून त्याचा शोध सुरु आहे. त्याचं शेवटचं लोकेशन आगरा येथे आढळून आलं. तर सध्या चैतन्यानंद हा लंडनमध्ये असल्याचा दावा केला जात आहे. 'बेबी, मी तुझ्यावर प्रेम करतो. तू मला खूप आवडते. तुझे केस छान असून ड्रेसमध्ये छान दिसते, असा व्हॉट्सअॅप मेसेज या बाबाने एका तरुणीला केल्याचंही पोलीस तपासात उघड झालं आहे.

Swami Chaitanyananda Saraswati update
Nandurbar Adivasi Morcha : नंदूरबार का पेटलं? आदिवासी मोर्चाला हिंसक वळण; १४० हून अधिक जण पोलिसांच्या ताब्यात

विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीत म्हटलं की,पहिल्यांदा संस्थेचे अध्यक्ष स्वामी चैतन्यानंद यांच्याशी बोलणं झालं. पहिल्या भेटीत ते विचित्र पद्धतीने पाहत असल्याचा दावा विद्यार्थिनीने केला आहे. तसेच स्वामीने व्हॉट्सअॅप अश्लील मेसेज केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

चैतन्यानंद आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थिनीचा लैंगिक छळ आणि मानसिक छळ करायचा. त्याने अनेक विद्यार्थिनींना परदेश दौऱ्यावर त्याच्यासोबत यायला भाग पाडायचा. विद्यार्थिनींना रात्री उशिरा खोलीत बोलवल्याचाही चैतन्यानंदवर आरोप आहे. अनेक पीडित विद्यार्थिनींना पदवी आणि कागदपत्रे रोखण्याची देखील धमकी द्यायचा. तसेच अनेक विद्यार्थिनींना शिक्षण संस्थेतून काढून टाकण्याची धमकी द्याचया. त्यामुळे संस्थेतील विद्यार्थिनी चैतन्यानंदला घाबरून असायच्या.

Swami Chaitanyananda Saraswati update
Relationship Tips : 34 ते 38 वयोगटातील महिला अफेअर का करतात? रिलेशनशिप कोचने सांगितलं सिक्रेट

काय आहे प्रकरण?

दिल्लीतील वसंत कुंज येथील एका खासगी व्यवस्थापन संस्थेचा अध्यक्ष चैतन्यानंद सरस्वती याच्यावर कर्नाटकातील श्री शारदा पीठम या संस्थेद्वारे चालवण्यात येणाऱ्या शिक्षण संस्थेतील १७ विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा देखील नोंदवण्यात आला आहे. चैतन्यानंद हा श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंटचा देखील संचालक आहे. त्याच्यावर अनेक विद्यार्थिनींना ईडब्लूएस कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन देऊन लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com