डाएटिशियन पत्नीची हत्या करून मृतदेह सिमेंटच्या पेटीत गाडला, मुलाला लिहिलेल्या चिठ्ठीने बेरोजगार पतीचे बिंग फुटलं, नेमकं घडलं काय ?

गुजरातमधील सूरतमध्ये बेरोजगार पतीने डायटिशियन पत्नीची हत्या करून मृतदेह सिमेंटच्या पेटीत लपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Crime
Crime Saam tv
Published On

एखाद्या माणसाच्या डोक्यात संशय आणि क्रूरता शिरली की तो कोणत्या थराला जाईल याचा नेम नाही. अशीच एक थरारक आणि धक्कादायक घटना गुजरातमधील सुरतमधून समोर आली आहे. घरची आर्थिक स्थिती कमकुवत होती, त्यातच व्यक्तीची नोकरी गेली. त्यानंतर पत्नीसोबत वारंवार खटके उडायला सुरूवात झाली. या वादाचे रूपांतर हत्याकांडात झालं. सूरतमधील बेरोजगार पतीने आपल्या 'डाएटिशियन' पत्नीची राहत्या घरात गळा आवळून हत्या केली. तो फक्त हत्या करून थांबला नाही त्याने आपल्या गुन्ह्याचा पुरावा मिटवण्यासाठी जे केलं, ते ऐकून पोलिसांच्याही अंगावर काटा आला आहे.

पत्नीची हत्या केल्यानंतर मुलाला पत्र लिहून बापाने सर्व काही सांगितले. पण त्यामुळेच त्याचे बिंग फुटले. पोलिसांनी आरोपी नवऱ्याला बेड्या ठोकल्या असून पुढील तपास सुरू आहे. आरोपीचे नाव विशाल साळवी आहे, त्याने ३९ वर्षीय डायटेशीयन पत्नीची हत्या केली. २० एप्रिल रोजी तिची हत्या करून मृतदेह सिमेंटने भरलेल्या सिमेंटच्या पेटीत लपवल्याचा आरोप आहे.

Crime
Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण, प्रति तोळा इतक्या रूपयांवर आले, वाचा 24k, 22k, 18k सोन्याचे दर

आरोपी विशाल साळवी याला सूरतजवळून बेड्या ठोकल्या. पोलिसांनी सांगितले की, विशाल साळवीने पत्नी शिल्पाचा मृतदेह सालाबतपुरा येथील त्याच्या जुन्या घरात लपवला. त्यानंतर पत्नी बेपत्ता असल्याची पोलिसात तक्रार दाखल केली होती. शिल्पाने अन्न आणि पोषणशास्त्रामध्ये एमएससी पदवी मिळवली होती. ती महापालिका-संचालित एसएमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आहारतज्ञ म्हणून काम करत होती. विशाल आणि शिल्पा यांना १३ आणि ८ वर्षांची दोन मुले आहेत.

लग्नाची सुरुवातीची वर्षे शांततेत गेली. पण कौटुंबिक वादामुळे बायकोला मारले. त्याने शिल्पाचा मृतदेह कागजी चाळीतील त्याच्या जुन्या घरात लपवला होता. तपास अधिकाऱ्यांच्या मते, विशालने कौटुंबिक भांडणानंतर पत्नीची हत्या केली. प्राथमिक तपासानुसार, हा वाद त्याच्या बेरोजगारीमुळे असू शकतो. हत्या केल्यानंतर विशालने कुटुंबीय आणि पोलीस या दोघांचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

शिल्पाचे वडील प्रदीप कोस्टा यांनी तक्रारीत म्हटले की, विशाल आणि शिल्पा यांचं लग्न नोव्हेंबर २०१० मध्ये झाले होते. विशाल आधी हिऱ्यांच्या उद्योगात काम करत होता. पण दोन वर्षांपासून विशाल बेरोजगार होता. त्यामुळे नवरा-बायकोंमध्ये वारंवार भांडणे होत होती. २१ एप्रिल रोजी शिल्पाला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण तिचा फोन बंद होता. त्यावेळीविशालशी संपर्क साधला, पण शिल्पा रुग्णालयात गेली असून परत आलेली नाही, असे सांगितले. त्यानंतर काहीतरी गडबड आहे हे लक्षात आले. त्यानंतर पोलिसांत तक्रार दिली, पण त्याच दिवशी विशालनेही शिल्पा हरवल्याची तक्रार दिली होती. त्यामुळे संशय अधिक वाढत गेला.

Crime
ड्रग्ज प्रकरणात रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा, कोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com