Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण, प्रति तोळा इतक्या रूपयांवर आले, वाचा 24k, 22k, 18k सोन्याचे दर

gold rate today Mumbai Pune latest price per gram : आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असून २४ कॅरेट सोनं प्रति तोळा ७१० रुपयांनी स्वस्त झाले आहे. मुंबई, पुण्यासह देशातील प्रमुख शहरांमध्ये २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरातही घट झाली आहे.
Gold Rate Today
Gold Rate Todayसाम टीव्ही मराठी
Published On

Gold Rate Today Mumbai Pune Jalgaon : जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्याच्या बाजारात चढ उतार पाहायला मिळत आहे. आखाती देशातील तणाव आणि डॉलरच्या किंमतीमुळे सोन्याच्या दरात मोठा बदल होत आहे. सोमवारी सोन्याचे दर वाढवले होते. पण आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत. २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा ७१० रूपयांनी घसरली आहे. मुंबई, पुण्यासह जळगाव आणि दिल्ली, कोलकाता, चेन्नईमध्ये सोन्याच्या दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. १८ कॅरेट, २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्याच्या दरात बदल झाला आहे.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत, त्यामुळे अमेरिकन डॉलर मजबूत झाला. त्याचा परिणाम थेट सोन्याच्या किंमतीवर पडला आहे. देशांतर्गत बाजारातही सोन्याचे दर घसरले आहेत. २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा ७१० रूपयांनी कमी झाली आहे. आज सराफा बाजारात २४ कॅरेट सोनं प्रति तोळा १ लाख ५३ हजार १५० रूपये इतकी झाली आहे. तर २२ कॅरेट सोन्याच्या किंमत प्रति तोळा १ लाख ४० हजार ४०० रूपये इतकी झाली आहे. २२ कॅरेट सोनं ६५० रूपयांनी स्वस्त झाले आहे. तर १८ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा ५३० रूपयांनी कमी होऊन एक लाख १४ हजार ९०० रूपयांवर आले आहे.

Gold Rate Today
पुढच्या आठवड्यात बारावीचा निकाल, दहावीच्या रिझल्टवरही अपडेट, mahresult.nic.in वर पाहा

भारतातील सोन्याचा भाव

भारतात २४-कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम १५,३०० रुपये इतका आहे. २२-कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम १४,०२५ रुपये आहे. १८-कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ११,४७५ रुपये आहे. भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात बदल झाला आहे. गुंतवणूकदार २२-कॅरेट आणि २४-कॅरेट सोन्याच्या दरातील चढ-उतारांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. आज सकाळी, चेन्नई आणि मुंबईसारख्या प्रमुख शहरांमधील दरांमध्ये वेगवेगळा कल दिसून आले. सुरुवातीच्या व्यवहारादरम्यान जागतिक बाजारातील ट्रेंडचा परिणाम देशांतर्गत बाजारात स्पष्टपणे दिसून आला. बाजारातील या सध्याच्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर, खरेदीदार सावधगिरी बाळगत आहेत आणि खरेदी करण्यापूर्वी दरांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

कोणत्या शहरात सोन्याची किंमत काय? (प्रति ग्रॅम)

लखनौ -

२४ कॅरेट - १५३१५

२२ कॅरेट - १४०४०

१८ कॅरेट - ११४९०

जयपूर -

२४ कॅरेट - १५३१५

२२ कॅरेट - १४०४०

१८ कॅरेट - ११४९०

दिल्ली -

२४ कॅरेट - १५३१५

२२ कॅरेट - १४०४०

१८ कॅरेट - ११४९०

पटना -

२४ कॅरेट - १५३०५

२२ कॅरेट - १४०३०

१८ कॅरेट - ११४८०

मुंबई -

२४ कॅरेट - १५३००

२२ कॅरेट - १४०२५

१८ कॅरेट - ११४७५

अहमदाबाद -

२४ कॅरेट - १५३०५

२२ कॅरेट - १४०३०

१८ कॅरेट - ११४८०

पुणे -

२४ कॅरेट - १५३००

२२ कॅरेट - १४०२५

१८ कॅरेट - ११४७५

कोलकाता -

२४ कॅरेट - १५३००

२२ कॅरेट - १४०२५

१८ कॅरेट - ११४७५

मेरठ -

२४ कॅरेट - १५३१५

२२ कॅरेट - १४०४०

१८ कॅरेट - ११४९०

लुधियाना -

२४ कॅरेट - १५३१५

२२ कॅरेट - १४०४०

१८ कॅरेट - ११४९०

Gold Rate Today
राज्यात एकनाथ शिंदेंची ताकद आणखी वाढणार, अख्खा पक्षच शिवसेनेत विलीन होणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com