राज्यात एकनाथ शिंदेंची ताकद आणखी वाढणार, अख्खा पक्षच शिवसेनेत विलीन होणार?

maharashtra political News : राज्यात एकनाथ शिंदे यांची ताकद आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण राज्यातील एक अख्खा पक्षच शिवसेनेत विलीन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
shivsena
Eknath Shinde Saam tv
Published On
Summary

विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे शिवसेनेच्या गोटात राजकीय हालचाली

बच्चू कडू यांचे विधानपरिषदेसाठी प्रयत्न

शिवसेनेकडून बच्चू कडू यांच्यासमोर ठेवली एक अट

अमर घटारे, साम टीव्ही

विधानपरिषदेच्या ९ जागांवरील निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीमुळे महायुतीतील घटकपक्षातही हालचाली वाढल्या आहेत. महायुतीतील घटकपक्ष शिवसेनेने देखील जोरदार फिल्डिंग लावली आहे. शिवसेनेच्या कोट्यातून विधानपरिषदेसाठी उमेदवारीसाठी अनेक राजकीय पक्षांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. बच्चू कडू यांनीही विधानपरिषदेच्या आमदारकीची उमेदवारी शिवसेनेतून मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु त्यांना प्रहार पक्ष विलीन करण्याची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे उद्या बुधवारी बच्चू कडू भूमिका स्पष्ट करणार आहेत.

shivsena
Maharashtra Politics: दापोलीत राजकीय भूकंप; शिंदे गटाचा दे धक्का! राष्ट्रवादी आणि भाजप नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने बैठकांचा सपाटा लावला आहे. प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून विधानपरिषदेवर जाण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करावा लागणार आहे. माजी मंत्री बच्चू कडू यांच्यासमोर शिवसेनेने ही मोठी अट घातली आहे. त्यामुळे बच्चू कडू उद्या बुधवारी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार आहे.

shivsena
एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिवसेनेत राजीनाम्याचा 'लेटर बॉम्ब', बड्या नेत्याने साथ सोडली

बच्चू कडू आज मंगळवारी पुन्हा प्रहार पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. त्याचबरोबर आज देखील शिवसेनेच्या नेत्यांसोबत बच्चू कडू यांची महत्वाची बैठक आहे. त्यामुळे येत्या दिवसांत बच्चू कडू काय निर्णय घेणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.

तत्पूर्वी, बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षानेही शिवसेनेकडे काही भूमिका मांडल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. बच्चू कडू यांना विधानपरिषदेसह राज्यात मंत्रिपद मिळावं, अशी इच्छा प्रहार पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेना नेत्यांना सांगितली आहे. प्रहार पक्षाचे नेते आणि शिवसेना नेत्यांमध्ये काय निर्णय होतो, हे पाहावे लागणार आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या भूमिका साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com