एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिवसेनेत राजीनाम्याचा 'लेटर बॉम्ब', बड्या नेत्याने साथ सोडली

satara political news : साताऱ्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेत राजीनाम्याचा 'लेटर बॉम्ब' पडला आहे. बड्या नेत्याने पक्षाची साथ सोडली.
eknath shinde news
Deputy CM Eknath Shinde Saam Tv
Published On
Summary

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीनंतरही शिवसेनेत नाराजीनाट्य

शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

बड्या नेत्यासह पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतरही राजकीय पक्षात नाराजीनाट्य सुरू आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीतील नाराजीनाट्यानंतर शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. साताऱ्यात शहराध्यक्षासह इतर पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. बड्या नेत्यासह पदाधिकाऱ्यांच्या सामूहिक राजीनाम्यामुळे शिवसेनेत खळबळ उडाली आहे.

साताऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गांधी मैदानावर भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याआधीच शहरप्रमुख निलेश मोरे यांनी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या राजीनाम्याने केवळ एक पद रिकामे झाले नसून शहरातील शहरप्रमुख ते बूथ प्रमुखांच्या सामूहिक राजीनाम्यामुळे संघटनेला मोठा धक्का बसला आहे. राजीनाम्याच्या 'लेटर बॉम्ब'मधून पक्षाच्या अंतर्गत कारभारावर बोट ठेवण्यात आले आहेत.

eknath shinde news
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या ३५ पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

निलेश मोरे यांनी संपर्कप्रमुखांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. 'कार्यकर्त्यांनी जीव तोडून काम करायचे. त्यानंतर श्रेय-निधी मात्र नातेवाईकांना? असा सवाल करत त्यांनी केला. बंडाचा सूर एखाद्या नाराज कार्यकर्त्याचा नसून कट्टर शिंदे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोरे यांच्याकडून उमटलाय. विकास निधीच्या वाटपात झालेला कथित पक्षपात, नियोजन समितीतून ऐनवेळी नाव वगळणे आणि सातत्याने डावलण्याचा आरोपावरून संतोष उघडपणे समोर आलाय.

eknath shinde news
Pune : 'जुन्या खोडांना' बाजूला सारून नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार? शिवसेना पुणे शहरासाठी कोणाला नेमणार?

गोवा-गुवाहाटीच्या राजकीय घडामोडीनंतर पक्षाशी निष्ठा राखली. अनेक योजनांसाठी शिबिरे, विविध कामे राबविल्याचा दावा पत्रात करण्यात आला आहे. तसेच साताऱ्यात ताकद उभी करण्यासाठी झटलेल्या कार्यकर्त्यांनाच दुय्यम वागणूक मिळत असेल, निष्ठा ठेवून काय उपयोग? असा सवाल मोरे यांनी केला आहे. आमची निष्ठा शिंदे यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत आहे. परंतु पदावर काम करण्याची इच्छा राहिली नाही, असेही मोरेंनी स्पष्ट केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com