सुनेत्रा पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या ३५ पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

sunetra pawar news : सांगलीत सुनेत्रा पवारांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीच्या ३५ पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे दिले आहेत.
sunetra pawar news update
Sunetra pawar
Published On
Summary

राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

स्वीकृत नगरसेवक निवडीवरून पक्षात नाराजी नाट्य

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून राजीनामे

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतर स्वीकृत नगरसेवक निवडीवरून विविध राजकीय पक्षात नाराजीनाट्य सुरू झालं आहे. स्वीकृत नगरसेवक निवडीवरून सांगलीतील पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे दिले आहेत.

सांगलीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वीकृत नगरसेवक निवडीवरून मोठा वाद उफाळून आलाय. राष्ट्रवादीच्या ३५ पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे दिले आहेत. या पदाधिकाऱ्यांकडून शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्याकडे राजीनामे सुपूर्द करण्यात आले आहेत.

sunetra pawar news update
काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याने तडकाफडकी राजीनामा देत पक्ष सोडला

महापालिकेचे गटनेते मैनुद्दिन बागवान यांच्याकडून पक्षाचा आदेश डावलत पक्षाशी संबंधित नसणाऱ्या व्यक्तीची स्वीकृत नगरसेवक पदी निवड करण्यात आल्याचा आरोप करत मैनुद्दीन बागवान यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी देखील शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्याकडून करण्यात आली आहे.

तत्पूर्वी, याप्रकरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे शहर राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलेला संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.

शिंदेसेनेला मोठा धक्का

अकोल्यात शिंदेसेनेला मोठा धक्का बसला आहे. अकोल्याचे जिल्हाप्रमुख अश्विन नवले यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. गोपीकिशन बाजोरिया यांच्यासोबत पक्ष सोडल्याची माहिती हाती आली आहे. या राजीनाम्यामुळे अकोल्यात पक्षातील अंतर्गत संघर्ष पुन्हा उघड झालाय.

sunetra pawar news update
काँग्रेसचे टेन्शन वाढलं, आमदार नितीन राऊत नाराज; थेट दिला पक्ष सोडण्याचा इशारा

अश्विन नवलेंनी काय पत्र लिहिलं?

'जय महाराष्ट्र, साहेब. आम्ही अकोल्यात एका विचाराने पक्ष वाढीसाठी प्रामाणिकपणे काम केलंय. माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया या स्वार्थी वृत्तीच्या व्यक्तीसोबत काम करणे माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याच्या मनाला पटणार नाही. समाजसेवक आहोत आणि राहू. परंतु पक्षाच्या पदासाठी गुलाम बनून राहू शकत नाही. त्यामुळे माझा राजीनामा स्वीकार करावा, असे अश्विनी नवले यांनी पत्रात लिहिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com