Gujrat Crime news
Gujrat Crime newssaam tv

Surat News: गुजरात हादरलं! एकाच कुटुंबातील ७ जणांची सामूहिक आत्महत्या

Gujarat Surat News: सूरतमध्ये एकाच कुटुंबातील ७ जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Published on

Surat News:

गुजरातच्या सूरतमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. सूरतमध्ये एकाच कुटुंबातील ७ जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कुटुंबातील सात सदस्यांनी विष प्राशन करून जीवन संपवलं आहे. या घटनेतील मृतांमध्ये तीन मुलांहित सात जणांचा समावेश आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मीडिया वृत्तानुसार, सूरतमधील एका व्यक्तीने त्याची पत्नी, आई-वडील, एक मुलगा आणि दोन मुलींसोबत सामूहिक आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शांतिलाल सोलंकी यांनी आधी गळफास घेऊन जीवन संपवलं. तर कुटुंबातील सदस्यांनी विष प्राशन करून जीवन संपवलं, असा संशय व्यक्त केला जात आहे. सूरतच्या पालनपूर येथे ही घटना घडली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Gujrat Crime news
Crime News: धावत्या लोकलमध्ये महिला होमगार्डला मारहाण; वाशिंदमधील खळबळजनक घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सूरतच्या पालनपूर येथे ही घटना घडली. या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. पालनपूर पाटिया येथील सिद्धेश्वर अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली.

शांतिलाल सोलंकी यांनी पत्नी, आई-वडील आणि तीन मुलांना विष दिलं. त्यानंतर शांतिलाल यांनी घरात गळफास घेऊन जीवन संपवलं. या घटनेची माहिती शेजाऱ्यांना कळाली. त्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

सामूहिक आत्महत्येच्या घटनेनंतर पालनपूर पाटिया येथे राहणाऱ्या लोकांमध्ये शोककळा पसरली आहे. या ७ जणांनी सामूहिक आत्महत्या का केली, याचा तपास करण्यासाठी या ७ जणांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत.

Gujrat Crime news
Delhi Crime News: दोन मुलांची आई अन् प्रियकर हॉटेलच्या रुममध्ये गेले; ४ तासांतच घडलं भयंकर

कुटुंबाची माहिती मिळविण्यासाठी पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या लोकांची चौकशी सुरु केली आहे. मात्र, या कुटुंबाने सामूहिक आत्महत्या का केली, याचा तपास अद्याप होऊ शकलेला नाही. तर या कुटुंबात काही वाद होते की आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली, याचा तपास पोलीस आता करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com