दिवस उजाडताच विमानाचा भीषण अपघात; क्षणात उडाला आगीचा भडका, पायलटसह सर्व प्रवाशांचा जागीच मृत्यू

sudan plane accident : दक्षिण सुदानमध्ये विमानाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पायलटसह सर्व प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे.
sudan plane crash
sudan plane update Saam tv
Published On
Summary

जगात आणखी विमानाची घडली भीषण दुर्घटना

विमानातील सर्व प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू

मृतदेहांची ओळख पटवणे देखील अवघड

Plane Crash in South Sudan : जगात आणखी एक विमान अपघाताची घटना घडली आहे. दक्षिण सुदानची राजधानी जुबाजवळ विमानाचा अपघात झाला. या दुर्घटनेत १४ जणांचा जागीच मृत्यू झालाय. विमान छोटे असल्याने त्यात पायलटसह १४ जण प्रवास करत होते. विमान जमिनीवर कोसळल्यानंतर क्षणात आगीचा भडका होऊन सर्व जण होरपळले. या आगीत होरपळल्यामुळे प्रवाशांच्या मृतदेहाची ओळख पटवणे देखील अवघड झालं आहे.

रिपोर्टनुसार, दक्षिण सुदानच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने सांगितलं की, 'तेथील स्थानिक वेळेनुसार सकाळी ७.१५ वाजता दुर्घटना घडली. विमानाने जुबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उड्डाण घेतलं. त्यानंतर २० किलोमीटरवर जाऊन प्रवाशांनी भरलेलं विमान कोसळलं. सैसना असे विमानाचे नाव आहे. विमानात पायलट आणि प्रवासी असे एकूण १४ जण होते.

sudan plane crash
भीषण अपघाताचा थरार; भरधाव बस उलटली, १५ जणांचा मृत्यू

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खराब वातावरण आणि दृश्यमानता कमी असल्याने विमान अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच संयुक्त राष्ट्राची बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. या पथकाकील एका सदस्याने सांगितले की, मृतदेहाचा जळून कोळसा झाला होता. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणे देखील अवघड झालं आहे'.

sudan plane crash
Accident News : आंबेनळी घाटात भीषण अपघात, ९०० फूट खोल दरीत पडून नवरा-बायकोचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

मृतांमध्ये दक्षिण सुदान आणि केनियाच्या नागरिकांचा समावेश आहे. दक्षिण सुदानचे १२ नागरिक आणि केनियाच्या २ नागरिकांचा समावेश आहे. दक्षिण सुदानमध्ये विमान अपघाताच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. खराब हवामान, जास्त भार, पायाभूत सुविधांच्या अभावामुळे विमान अपघात वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे. मागील काही वर्षात झालेल्या विमान अपघातात झझनभर लोकांचा बळी गेला आहे.

अपघातानंतर तपास सुरू करण्यात आला आहे. या अपघाताचा अधिकृत तपास अहवाल प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. तपास यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले आहेत. या संपूर्ण तपासानंतरच अपघाताचे कारण कळेल. वाढत्या विमान अपघातामुळे हवाई प्रवासाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com