Accident News : आंबेनळी घाटात भीषण अपघात, ९०० फूट खोल दरीत पडून नवरा-बायकोचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

Satara Accident News : साताऱ्यातील आंबेनळी घाटात ९०० फूट खोल दरीत कोसळून दांपत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुसळधार पाऊस आणि धुक्यामुळे बचावकार्य कठीण झाले असून या घटनेमुळे घाट रस्त्यांवरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Accident News : आंबेनळी घाटात भीषण अपघात,  ९०० फूट खोल दरीत पडून नवरा-बायकोचा मृत्यू; नेमकं काय घडलं?
Satara Accident NewsSaam Tv
Published On
Summary
  • आंबेनळी घाटात ९०० फूट दरीत कोसळून दांपत्याचा मृत्यू

  • मुसळधार पाऊस आणि धुक्यामुळे बचावकार्य कठीण

  • पोलिस व बचाव पथकाची धाडसी मोहीम

  • घाट रस्त्यांवरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

ओंकार कदम, सातारा

साताऱ्यातून मोठी बातमी समोर आली आहे. आंबेनळी घाट येथे अत्यंत दुर्दैवी अपघात घडला असून, सुमारे ९०० फूट खोल दरीत कोसळून एका दांपत्याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आणि बचाव पथकाने रेस्क्यू ऑपरेशन करून मृतदेह बाहेर काढले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून हा अपघात नेमका कसा झाला याचे अद्यापही कारण समोर आलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील आंबेनळी घाट येथे कुंभरोशी गावाजवळ,पोलादपूर हद्दीत रस्त्याच्या कडेला संशयास्पद स्थितीत एक मोटारसायकल आढळून आल्याने स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना कळवले. त्यानंतर त्वरित शोधमोहीम सुरू करण्यात आली. घाट परिसरात अंधार, मुसळधार पाऊस आणि दाट धुके असल्यामुळे परिस्थिती अत्यंत कठीण होती.

Accident News : आंबेनळी घाटात भीषण अपघात,  ९०० फूट खोल दरीत पडून नवरा-बायकोचा मृत्यू; नेमकं काय घडलं?
Shocking : वर्षाला ४० लाखाची कमाई करणारा इंजिनियर बनला हैवान; वडिलांसह कुटुंबातील ८ जणांचा घेतला जीव,नेमकं कारण काय?

तरीही बचाव पथकाने दोरांच्या सहाय्याने जीवाची पर्वा न करता खोल दरीत उतरून शोधकार्य सुरू ठेवले. मात्र, रात्री उशिरा हवामान अधिक खराब झाल्याने आणि दृश्यमानता कमी झाल्यामुळे बचावकार्य काही काळासाठी थांबवावे लागले. आज सकाळी पुन्हा एकदा पोलीस, बचाव पथक आणि स्थानिक प्रशासनाने संयुक्तपणे मोहीम सुरू केली. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सुमारे ९०० फूट खोल दरीत पुरुषाचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर आणखी सुमारे १५० फूट खाली महिलेचा मृतदेहही सापडला.

Accident News : आंबेनळी घाटात भीषण अपघात,  ९०० फूट खोल दरीत पडून नवरा-बायकोचा मृत्यू; नेमकं काय घडलं?
Mumbai : 'तुझे ते फोटो व्हायरल करेन', महिला क्रिकेटपटूला मुंबई पोलिसांकडून अटक, प्रसिद्ध व्यवसायिकाला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवलं

या अपघातात मृत्यू पावलेल्यांची ओळख मोहन चव्हाण आणि जयश्री चव्हाण अशी झाली आहे. या दुर्दैवी घटनेने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, बचाव पथकाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत धाडसाने कामगिरी पार पाडल्यामुळे त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्थानिक प्रशासनानेही या मोहिमेत सहभागी सर्व यंत्रणांचे आभार मानले आहेत. या अपघातामुळे घाट रस्त्यांवरील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेषतः पावसाळी वातावरणात आणि धुक्याच्या परिस्थितीत वाहन चालवताना अधिक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com