

जम्मूमध्ये अपघातात थरार
उधमपूरमधील बस अपघातात १५ जणांचा मृत्यू
७ प्रवाशांच्या मृत्यूने परिसरात शोककळा
Ramnagar Bus Accident Jammu: जम्मू-काश्मीरच्या ऊधमपूर जिल्ह्यातील रामनगर भागात भीषण अपघात घडला. खगोट भागात भरधाव बस अनियंत्रित होऊन उलटल्याची घटना घडली. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच प्रशासन आणि पोलीस बचाव कार्यासाठी धावले. त्यांनी तातडीने घटनास्थळी रुग्णवाहिका पाठवली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. तर जखमींनाही उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल केले. स्थानिक नागरिकही मदतीला धावले आहेत.
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी उधमपूरमधील रामनगरमधील दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं की, 'मी दुर्घटनेविषयी माहिती घेत आहो. उपायुक्तांशी बोलणं झालं आहे. प्रशासनाला तातडीने मदत करण्याचे निर्देश दिले आहेत'. डॉ. जितेंद्र सिंह यांनी पुढे म्हटलं की, रामनगरहून ऊधमपूरला जाणाऱ्या सरकाराच्या बसचा अपघात झाला. प्रशासनाने क्षणाचाही विलंब न करता तातडीने मदत कार्य सुरू केलं आहे'.
मृतांचा आकडा अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गंभीर जखमी प्रवाशांना एअरलिप्ट करण्याची व्यवस्था केली जात आहे. अपघातानंतर रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पोलिसांनी वाहतूक इतरत्र वळवली आहे. या भीषण अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांकडून रस्त्याची गुणवत्ता सुधारण्याची मागणी केली जात आहे. या अपघातानंतर स्थानिक प्रशासन काय निर्णय घेतंय, हे पाहावे लागेल.
अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर काही प्रवासी तातडीने बसमधून बाहेर आले. अनेकांनी त्यांच्या नातेवाईकांना बसमधून बाहेर काढले. अपघातात काही प्रवाशांनी घरातील जवळच्या लोकांना गमावलं. या प्रवाशांनी तातडीने प्रशासन आणि त्यांच्या नातेवाईकांना कळवलं. या अपघातात बसचा चक्काचूर झाला आहे. १५ प्रवाशांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.