Nashik Accident: दिंडोरीत भीषण अपघात; कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा मृत्यू

Fatal Accident in Dindori: नाशिकच्या दिंडोरीमध्ये भीषण अपघात झाला आहे. एक कार विहिरीत कोसळली असून या अपघातात ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा मृत्यू झाला.
Fatal Accident in Dindori:
Fatal Accident in Dindori:saam tv
Published On
Summary
  • दिंडोरीत कार विहिरीत कोसळून ९ जणांचा मृत्यू

  • मृतांमध्ये ७ विद्यार्थी आणि २ पालकांचा समावेश

  • कार्यक्रमावरून परतताना घडली दुर्घटना

नाशिकमधील दिंडोरी शहरात शुक्रवारी रात्री काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला आहे. एका खाजगी क्लासचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि गुणगौरव समारंभ आटोपून घरी परतत असताना, विद्यार्थ्यांसह पालकांची कार विहिरीत कोसळसली. यात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये ७ विद्यार्थी आणि २ पालकांचा समावेश असल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

Fatal Accident in Dindori:
Kalyan : कल्याणमध्ये भीषण अपघात, भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, डॉक्टरचा जागीच मृत्यू

हाती आलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील इंदोरे येथील रहिवासी असलेले दरगोडे कुटुंब आणि काही विद्यार्थी दिंडोरी शहरात एका खाजगी शिकवणीच्या कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रम पार पडल्यानंतर रात्री १० वाजेच्या सुमारास हे सर्वजण कारने (क्र. MH15-JS-1053) गावाकडे परतत होते. यावेळी शिवाजी नगर भागातील पाण्याने भरलेल्या उघड्या विहिरीत ही कार कोसळली. ही विहीर राजू राजे यांच्या मालकीची आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस प्रशासन, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने आणि रात्रीचा अंधार असल्याने कार शोधण्यात अडचणी येत होत्या. तब्बल ३ हायड्रा क्रेनच्या साहाय्याने रात्री १२ वाजेच्या सुमारास ही कार विहिरीबाहेर काढण्यात आली. कार बाहेर काढल्यानंतर त्यातील ९ जणांचा गुदमरून आणि बुडून मृत्यू झाला. या भीषण अपघातात इंदोरे गावातील एकाच कुटुंबातील सदस्यांचा समावेश असल्याने संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.

​उपलब्ध झालेली मृतांची नावे:

१. सुनील दत्तू दरगोडे

२. राखी सुनील दरगोडे

३. उषा अनिल दरगोडे

४. श्रद्धा अनिल दरगोडे

५. श्रावणी अनिल दरगोडे

इतर ४ मृतांची ओळख पटवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू आहे. पोलीस प्रशासनाकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com