दोन शहरात भीषण गोळीबार; 27 जणांचा मृत्यू, 15 गंभीर जखमी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

South Africa Shooting Kills 27 People And Injures 15: दक्षिण आफ्रिकेतील दोन शहरांजवळ झालेल्या भीषण गोळीबाराच्या घटनांमध्ये 27 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. जोहान्सबर्गजवळील वेडेला टाउनशिपमध्ये 17 जणांचा मृत्यू झाला.
SOUTH AFRICA SHOOTING
SOUTH AFRICA SHOOTINGsaam tv
Published On: 

दक्षिण आफ्रिकेतील दोन मोठ्या शहरांजवळ शनिवारी गोळीबाराच्या घटनांमध्ये 27 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी रविवारी या घटनांची माहिती दिली. पहिली घटना जोहान्सबर्गच्या नैऋत्येला असलेल्या वेडेला टाउनशिपमध्ये शनिवारी रात्री घडली. याठिकाणी काही नागरिक बसले होते. त्यांच्यावर काही आज्ञातानी अचानक अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 17 जणांचा मृत्यू झाला.

SOUTH AFRICA SHOOTING
Accident : भीषण अपघात! गोंदियात पिकअपचा चेंदामेंदा, ६ जणांचा जागीच मृत्यू, ७ जण गंभीर जखमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, AK-47 रायफल आणि पिस्तूलांनी आठ संशयितांनी मद्यपान करणाऱ्या नागरिकांवर गोळीबार केला. त्यानंतर संशयित एका माॅलमध्ये घुसले आणि तेथेही लोकांवर गोळीबार केला. या घटनेतील सर्व 17 जणांचा मृत्यू घटनास्थळीच झाल्याचे आपत्कालीन वैद्यकीय पथकाने सांगितले. मृतांमध्ये 13 पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे. तर गोळीबारात जखमी झालेल्या 15 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

SOUTH AFRICA SHOOTING
Road accident: महामार्गावर रात्री भीषण अपघात! उभ्या लॉरीवर कार आदळून ८ इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

रविवारपर्यंत या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती. गोळीबारामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

SOUTH AFRICA SHOOTING
Accident: थरारक अपघात! भरधाव बसची २ दुचाकींना धडक, चाकाखाली चिरडून ५ जणांचा मृत्यू

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेतील डर्बन शहराजवळ एका घरातील पार्टीत झालेल्या गोळीबारात 11 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये एका गर्भवती महिलेचाही समावेश होता. सलग घडलेल्या या गोळीबाराच्या घटनांमुळे दक्षिण आफ्रिकेतील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून देशात भीतीचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com